कमजोर हृदयाच्या लोकांनी पाहू नये, जॉनच्या सर्जरीचा हा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 14:48 IST2016-11-08T14:48:24+5:302016-11-08T14:48:24+5:30

जॉन अब्राहम म्हणजे दमदार अ‍ॅक्शन हिरो. जॉनला आपण अनेक चित्रपटात एकापेक्षा एक धोकादायक स्टटं करताना पाहिले. खरे तर आपण पडद्यावरचे स्टंट अगदी सहजपणे, मनोरंजन म्हणून पाहतो. पण यामागे असते कलाकारांची प्रचंड मेहनत. या स्टंट सीन्ससाठी कलाकारांना बराच घाम गाळावा लागतो. प्रसंगी रक्त सांडवावे लागते. जॉन अशाच कलाकारांपैकी एक़ जॉनने अलीकडे इन्स्टाग्रामवर त्याच्या गुडघ्याच्या सर्जरीला व्हिडिओ शेअर केला.

People of weak heart should not see this video of John's surgery !! | कमजोर हृदयाच्या लोकांनी पाहू नये, जॉनच्या सर्जरीचा हा व्हिडिओ!!

कमजोर हृदयाच्या लोकांनी पाहू नये, जॉनच्या सर्जरीचा हा व्हिडिओ!!

न अब्राहम म्हणजे दमदार अ‍ॅक्शन हिरो. जॉनला आपण अनेक चित्रपटात एकापेक्षा एक धोकादायक स्टटं करताना पाहिले. खरे तर आपण पडद्यावरचे स्टंट अगदी सहजपणे, मनोरंजन म्हणून पाहतो. पण यामागे असते कलाकारांची प्रचंड मेहनत. या स्टंट सीन्ससाठी कलाकारांना बराच घाम गाळावा लागतो. प्रसंगी रक्त सांडवावे लागते. जॉन अशाच कलाकारांपैकी एक़ जॉनने अलीकडे इन्स्टाग्रामवर त्याच्या गुडघ्याच्या सर्जरीला व्हिडिओ शेअर केला. ‘blood and sweat  go into making a film... we mean it! In the hospital on my way to 3 knee surgeries while shooting for Force2 #pain #comeoutstronger@force2thefilm’ , असे जॉनने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले. खरे तर कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडिओ न पाहिलेलाच बरा. पण खंबीर मनाच्या लोकांनी किमान ‘जिगरबाज’ जॉनच्या चाहत्यांनी तरी हा व्हिडिओ बघायलाच हवा.  



 ‘फोर्स2’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान जॉनच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली. आधी जॉनने याकडे दुर्लक्ष केले आणि तशाच अवस्थेत चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. पण याचा परिणाम म्हणजे, त्याला आपल्या गुडघ्यावर तीनदा सर्जरी करावी लागली. गुडघ्याला जखम झाली, त्याठिकाणी  जॉनचे रक्त गोठले होते.यापैकी एका सर्जरीचा व्हिडिओ जॉनने शेअर केला आहे. यात जॉन वेदनेने तडफडतांना दिसतो आहे. मला गुडघ्याला जखम झाली तेव्हाच काहीतरी गडबड आहे, असे मला जाणवले. कारण डॉक्टर उपचार करत असताना मी वेदनेने विव्हळत होतो. पण तरिही मी शूटींगवर परतण्याची चूक केली आणि मला तीन शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. ‘फोर्स2’साठी मी घाम गाळला. रक्त सांडवले आणि प्रचंड वेदना सोसली, असे जॉन या व्हिडिओत म्हणतोय.
 

Web Title: People of weak heart should not see this video of John's surgery !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.