पुलकित सम्राटच्या कोस्टारच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, फॅन्स करु लागलेत या विचित्र विचित्र मागण्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 13:52 IST2018-02-17T08:22:12+5:302018-02-17T13:52:12+5:30
सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार वाट्टेल ते करायला तयार असतात.सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं ...
.jpg)
पुलकित सम्राटच्या कोस्टारच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, फॅन्स करु लागलेत या विचित्र विचित्र मागण्या!
स नेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार वाट्टेल ते करायला तयार असतात.सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं कलाकार प्रमोशन करण्याची संधी सोडत नाहीत. कलाकार सोशल मीडियावरही बरेच एक्टिव्ह आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरुन आपल्या सिनेमाचे प्रमोशन करत आपल्या फॅन्सशी हे कलाकार संवाद साधतात. मात्र हेच प्रमोशन कधी कधी कलाकारांना चांगलंच अडचणीतही आणतं. कलाकारांवर रसिक जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे रसिक आपल्या लाडक्या अभिनेता आणि अभिनेत्रीकडे अशी काही मागणी करतात की ज्यामुळे त्यांना अगदी अवघडल्यासारखं होतं. असाच काहीसा प्रकार एका अभिनेत्रीबाबत घडला आहे. गेल्या वर्षी फुकरे रिटर्न्स या सिनेमानंतर अभिनेता पुलकित सम्राट त्याच्या आगामी 'वीरे की वेडिंग' या सिनेमात बिझी आहे. या सिनेमात पुलकित सम्राटसह दाक्षिणात्य अभिनेत्री कृती खरबंदा झळकणार आहे.सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा असली तरी कृती कुठेही चर्चेत नव्हती. मात्र गेल्या 2 दिवसांत कृती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. याला निमित्त ठरलं आहे ते कृती खरबंदा हिने सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे काही फोटो. इन्स्टाग्रामवर कृतीने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील त्याची ग्लॅमरस अदा पाहून रसिक फिदा झाले आहेत. रसिकांकडून कृतीवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सोशल मीडियावर कृतीचा हा फोटो व्हायलर झाला असून रसिक सोशल मीडियावर तिच्याकडे विविध मागण्याही करु लागले आहेत. कुणी कृतीला लग्नाची मागणी घातली आहे तर कोण म्हणते की कृती कृपया तुझा बिकीनी लूक दाखव. कृतीने हे फोटो फेमिना ब्युटी अवॉर्ड शोमध्ये काढलेले होते. या फोटोमधील कृतीचे स्मित हास्य असणारे फोटो आणि हॉट अंदाजातील फोटो कुणालाही घायाळ करतील. त्यामुळे शुक्रवारी पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला अशाच प्रकारच्या विविध प्रतिक्रिया क्रृतीच्या या फोटोंवर येऊ लागल्या आहेत. कृतीने या प्रकारचे फोटोशूट पीकॉक मासिकाच्या कव्हरपेजसाठी केले होते.