पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:04 PM2023-03-10T14:04:44+5:302023-03-10T14:06:12+5:30

'पठाण' लवकरच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.

pathaan movie extended version will be seen at ott platform | पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार

पठाण नाही तर 'हे' होतं शाहरुखचं सिनेमात नाव, ओटीटीवर खरी कहाणी बघायला मिळणार

googlenewsNext

Pathaan Movie OTT : बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' सिनेमा सुपरहिट ठरला. त्याने ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं. गेल्या काही वर्षांच्या ब्रेकनंतर पठाणच्या यशाने बॉलिवुडचे बुडते जहाज वर आणले. ४० दिवस उलटुन गेले तरी पठाण अजुनही बॉक्सऑफिसवर कमाई करतोय. आता सिनेमा ओटीटी वर कधी येणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. नवीन मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाचे एक्सटेंडेड व्हर्जन ओटीटीवर बघायला मिळणार आहे. आता ओटीटीवर जास्तीचं नक्की काय बघायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

२५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला 'पठाण' अजुनही बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सहाव्या आठवड्यातही सिनेमाने 5.82 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या सिनेमाची क्रेझ पाहता आता 'पठाण'च्या ओटीटी रिलीजची उत्सुकता आहे.

मेकर्सने अद्याप 'पठाण'च्या ओटीटी रिलीज विषयी घोषणा केलेली नाही. मात्र 'पठाण' अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार हे निश्चित आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एका मुलाखतीत सांगितले, 'पठाणचे ओटीटी व्हर्जन थिएटरहून जास्त मोठे असेल.म्हणजेच ओटीटीवर सिनेमाचे एक्सटेंडेड व्हर्जन दाखवण्यात येणार आहे. हे व्हर्जन म्हणजे पठाणचे बालपण. त्याचे काही नाव नसते आणि तो एका थिएटरमध्ये दिसतो. त्याचं खरं नाव 'नवरंग' असतं आणि मग तो 'पठाण' कसा बनतो. हे सर्व सिनेमाच्या फायनल एडिटमध्ये कट केले गेले होते. ते आता ओटीटीमध्ये दाखवण्यात येणार आहे.

शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण अनेक वेळा थिएटरमध्ये पाहिला असणार. मात्र आता ओटीटीवर कट केलेला भागही पाहायला मिळणार म्हणल्यावर चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे ओटीटीवरही 'पठाण'ला तुफान प्रतिसाद मिळणार असंच चित्र आहे. एप्रिल महिन्यात पठाण ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. 

Web Title: pathaan movie extended version will be seen at ott platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.