Parineeti-Raghav Wedding: उदयपुरमध्ये परिणीती-राघव यांचं ग्रॅण्ड वेलकम, स्वागतासाठी लागलेत मोठे बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:29 IST2023-09-22T13:28:46+5:302023-09-22T13:29:06+5:30
Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Parineeti-Raghav Wedding: उदयपुरमध्ये परिणीती-राघव यांचं ग्रॅण्ड वेलकम, स्वागतासाठी लागलेत मोठे बॅनर
अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chaddha) यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता काही दिवसांतच हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे. परिणीती आणि राघव उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. शुक्रवारी सकाळी हे जोडपे उदयपूरला रवाना झाले आहेत. परिणीती आणि राघव यांचे उदयपूरमध्ये भव्य स्वागत होणार आहे. स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिणीती आणि राघव उदयपूरला पोहोचले आहेत. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
परिणीती आणि राघव यांचे उदयपूरमध्ये भव्य स्वागत झाले आहे. त्यांच्या नावाचे एक मोठे पोस्टरही लावण्यात आले असून त्यावर वेलकम टू उदयपूर परिणिती आणि राघव असे लिहिले आहे. याशिवाय लोक बँड आणि ढोल-ताशांसह कार्यक्रमस्थळी त्यांची वाट पाहत असतात. हे स्वागत संपूर्ण पंजाबी शैलीत होईल. शुक्रवारी सकाळी परिणिती आणि राघव त्यांच्या कुटुंबासह दिल्ली विमानतळावर दिसले. यावेळी परिणीती अगदी सिंपल कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने लाल रंगाचा जंपसूट घातला होता. राघव यांच्या लूकबद्दल सांगायचे तर, त्यांनी काळ्या रंगाच्या फुल स्लीव्हज टी-शर्टसह डेनिम घातला होता.
कुटुंब सुफी नाइट्सला पोहोचले
परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे फंक्शन दिल्लीतच सुरू झाले होते. नुकतेच सुफी नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थही उपस्थित होते. त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
२४ सप्टेंबरला घेणार सात फेेरे
परिणीती आणि राघव यांचे लग्न २३-२४ सप्टेंबरला उदयपूरमध्ये पार पडणार आहे. २४ सप्टेंबरला सेहराबंदीनंतर दुपारी लग्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये काही खास सेलेब्स कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर चंदीगडमध्ये रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले आहे.