परिणिती इन न्यू फिगर ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:28 IST2016-01-16T01:18:03+5:302016-02-07T06:28:10+5:30

             आ पल्या गुटगुटीत तब्येतीसाठी प्रसिद्ध असलेल्या परिणीती चोप्राने मधल्या काळात तिच्या तब्येतीवर मेहनत ...

Parineeti in New Figure .... | परिणिती इन न्यू फिगर ....

परिणिती इन न्यू फिगर ....


/>             आ पल्या गुटगुटीत तब्येतीसाठी प्रसिद्ध असलेल्या परिणीती चोप्राने मधल्या काळात तिच्या तब्येतीवर मेहनत घेण्याचे भलतेच मनावर घेतले होते. आणि याचे फळही तिला मिळाले. आकर्षक फिगर मिळवण्यात परिणीतीला आता यश मिळाले आहे. मात्र यासाठी बराच काळ जावा लागला. तिच्या फिगरबाबत बोलताना ती म्हणाली 'खूप आधीपासूनच फिटनेसवर काम करायचे होते पण वेळेअभावी शक्य होत नव्हते.

             मला मी जशी दिसायला पाहिजे होते तशी मी आता दिसते आहे आणि मला माझ्या आवडीप्रमाणे ड्रेसेस घालता येत आहेत यामुळे मी जाम खूश आहे.' सकस आहार आणि नियमित व्यायाम हाच आपला फिटनेस मंत्र असल्याचेही तिने सांगितले. तीला कामासाठी उर्जा कुठून मिळते याप्रश्नाचे तिने 'अन्न' असे खट्याळपणे उत्तर दिले. नंतर मात्र दिलखुलास हसत ती म्हणाली की,' कितीही फिल्मी वाटत असले तरीही चाहत्यांचे प्रेम हेच तिच्या उज्रेचे स्त्रोत आहे.'

Web Title: Parineeti in New Figure ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.