लग्नानंतर पतीसोबत आपलं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेट करणार परिणीती चोप्रा, अभिनेत्रीने दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:01 PM2023-12-11T16:01:35+5:302023-12-11T16:14:02+5:30

परिणीती चोप्रा पती राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा करणार आहे.

Parineeti chopra started preparations for her first christmas celebration with husband raghav chadha after wedding | लग्नानंतर पतीसोबत आपलं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेट करणार परिणीती चोप्रा, अभिनेत्रीने दाखवली झलक

लग्नानंतर पतीसोबत आपलं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेट करणार परिणीती चोप्रा, अभिनेत्रीने दाखवली झलक

परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चढ्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच कपल म्हणून आपलं फेस्टिव्हल साजरं करतायेत. या दोघांनी  उदयपूरमध्ये यावर्षी 24 सप्टेंबरला भव्य लग्न सोहळा पार पडला. तेव्हापासून हे जोडपे कुटुंबियांसोबत सर्व सण आनंदाने साजरे करताना दिसत आहे. करवा चौथपासून दिवाळीच्या सेलिब्रेशनपर्यंत या कपलने त्यांच्या प्रत्येक सणाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आता  अभिनेत्री पती राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नानंतरचा पहिला ख्रिसमस साजरा करणार आहे. परीनेही घरी ख्रिसमस सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका व्हिडिओमध्ये याची झलक दाखवली आहे.

परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या पहिल्या ख्रिसमस सेलिब्रेशनच्या तयारीची झलक शेअर केली आहे. परीने शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये, तिने चाहत्यांना तिच्या ख्रिसमस ट्रीची बबल्स, रेड हार्ट आणि लाईट्सनी सजवलेल्या सुंदर ख्रिसमस ट्रीची झलक दाखवली आहे.

दरम्यान राघव चड्ढा यांच्याशी लग्न केल्यानंतर परिणीतीही राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे.  तिने नुकतेच गुजरातच्या वडोदरामध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिला भविष्यात कधी राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने उत्तर दिलं, 'राघवला बॉलिवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाची कल्पनाही नाही'.  पुढे ती म्हणाली, 'त्यामुळे तुम्ही मला राजकारणात येताना पाहाल असं मला वाटत नाही. आम्ही दोघे सार्वजनिक जीवनात आहोत, तरीही संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची कल्पना आम्हाला नव्हती. मला वाटते की जर तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन खूप छान आहे'.

परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘मिशन रानीगंज’ चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. लवकरच परिणीती ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. 'चमकिला'मध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. 

Web Title: Parineeti chopra started preparations for her first christmas celebration with husband raghav chadha after wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.