परिणीती चोप्रा बनली गायकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 10:30 IST2017-03-28T05:00:32+5:302017-03-28T10:30:32+5:30

परिणीती चोप्रा आपला आनंद ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना बरोबर शेअर केला आहे. परीने मेरी प्यारी बिंदू या आगामी चित्रपटात ...

Parineeti Chopra became a singer | परिणीती चोप्रा बनली गायकी

परिणीती चोप्रा बनली गायकी

िणीती चोप्रा आपला आनंद ट्विटरच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना बरोबर शेअर केला आहे. परीने मेरी प्यारी बिंदू या आगामी चित्रपटात माना की हम यार नहीं या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तिच्या गाण्यातील डेब्यूबाबत परिणीती सांगते मला गायचे स्वप्न होते पण ते प्ले बॅक सिगिंगच्या माध्यमातून पूर्ण होईल असे मला कधीच वाटले नव्हते. या गाण्याला घेऊन मी खूपच एक्सायटेड आहे.  तर या चित्रपटाचे संगीतकार  सचिन-जिगर यांनी परी प्रोफशनल सिंगरलाही टक्कर देऊ शकेल एवढा चांगला तिचा आवाज आहे. तिने जर अशीच प्रॅक्टिस सुरू ठेवली तर ती नक्कीच प्रोफशनल गायिका म्हणून पुढे येऊ शकते असे म्हटले आहे.

 मेरी प्यारी बिंदू हा चित्रपटाची कथा अक्षय रॉयने लिहिली आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यानेच केले आहे. मेरी प्यारी बिंदू हा चित्रपट रोमांस आणि ड्रामाने भरलेला आहे. 
यशराज बॅनरखाली तयार होणार हा चित्रपट 12 मे 2017 ला प्रदर्शित होणार आहे. आयुष्मान खुराना या चित्रपटात लेखक अभिमन्यु रॉयची भूमिका साकारतो आहे. तर परी या चित्रपटात  एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.  परिणीती 1 वर्षनंतर या चित्रपटातून पुन्हा दमदार पदार्पण करण्यास सज्ज आहे. किल दिल या चित्रपटात परिणीती रणवीर सिंगसोबत गेल्यावर्षी दिसली होती.  परिणीतीने 2011मध्ये लेडिज व्हर्सेस विकी बेहल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

Web Title: Parineeti Chopra became a singer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.