पालकांनो... मुलांना कसे शिकवावे, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हे चित्रपट बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 14:33 IST2017-08-24T09:01:54+5:302017-08-24T14:33:19+5:30

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक निरागस चिमुकलीचा रडत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या चिमुकलीची आई तिचा अभ्यास ...

Parents ... how to teach children how to teach this movie if you fall in love! | पालकांनो... मुलांना कसे शिकवावे, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हे चित्रपट बघाच!

पालकांनो... मुलांना कसे शिकवावे, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हे चित्रपट बघाच!

ही दिवसांपासून सोशल मीडियावर एक निरागस चिमुकलीचा रडत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये या चिमुकलीची आई तिचा अभ्यास घेत असून, ती रडत-रडत आईच्या प्रश्नांची उत्तरे देते. या चिमुकलीला तिची आई मारत असल्याने ती खूपच भयभीत झाल्याचेही दिसून येते. हा व्हिडीओ जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्या बघण्यात आला तेव्हा ते खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी आई-वडिलांना विनंती करीत अशा पद्धतीने आपल्या पाल्यांना शिकवू नका, असा सल्ला दिला. ही मुलगी बॉलिवूड गायक आणि कंपोजर तोशी आणि शरीब साबरी यांची भाची आहे. असो, विराटने दिलेला सल्ला विचार करायला लावणारा आहे. अशातही आपल्या पाल्यांचा अभ्यास कसा घ्यावा, असा जर पालकांना प्रश्न पडत असेल तर त्यांनी बॉलिवूडचे हे चित्रपट नक्कीच पहावे. 



टेक इट इजी
‘टेक इट इजी’ या चित्रपटात, आई-वडील आपल्या मुलांच्या माध्यमांतून स्वप्नांची पूर्तता कशी करतात, हे दाखविण्यात आले आहे. मुलांना स्कॉलरशिप मिळो ना मिळो पण त्यांना मेडल नक्कीच मिळाले पाहिजे. त्यामुळे मुलांचा अभ्यास घेण्याअगोदर पालकांनी हा चित्रपट नक्की बघायला हवा. कारण मारपीट केल्याने आपल्या मुलाचे शिक्षणात अधिक लक्ष लागेल, असा पालकांचा समज या चित्रपटातून खोडून काढला जातो. 



तारे जमीन पर
या चित्रपटातून मुलांच्या मानसिकतेनुसार त्यांना कुठल्या पद्धतीचे शिक्षण द्यायला हवे, याचा वस्तुपाठच सांगण्यात आला आहे. चित्रपटात एक मुलगा डिस्लेक्सिया या आजाराने पीडित असतो. या मुलाला अक्षरांमधील फरक माहिती नसतो. अशात आमीर खान शिक्षकाच्या भूमिकेतून या मुलाचा आजार बरा करतो. पुढे जाऊन हा मुलगा स्वत:च्या पायावर उभा राहतो. चित्रपटात आमीरने पार पडलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद असून, पालकांनी धडा घेणारी आहे. 



नील बटे सन्नाटा

या चित्रपटात एक आई आपल्या मुलीला उच्चशिक्षण देऊन तिला एका चांगल्या पदावर बघू इच्छित असते. मात्र आजच्या जमान्यात शिक्षणावरील खर्च पाहता, ही आई मुलीला शिकविताना स्वत:ही शाळेत अ‍ॅडमिशन घेते. चित्रपटात मुलांचा अभ्यास घेताना कशा पद्धतीचे आपले वर्तन असायला हवे, हे दाखविण्यात आले आहे. एक आई आपल्या मुलीला ज्या पद्धतीने शिक्षणासाठी प्रोत्साहित करते ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. 



जागृती
‘आओ बच्चो तुम्हे दिखाएं झांकी हिन्दुस्तान की’ हे गीत ‘जागृती’ या चित्रपटातील आहे. चित्रपटात मुलांच्या हॉस्टेल लाइफपासून त्यांना कशा पद्धतीने शिक्षणाचे धडे द्यायला हवे हे दाखविण्यात आले आहे. मुलांना प्रत्येक विषय त्यांच्या आवडीनुसार शिकवायला हवे, असे दाखविण्यात आले आहे. चित्रपटात एक शिक्षक मुलांना शिक्षणात रुची निर्माण व्हावी यासाठी काय-काय फंडे करतो हे दाखविण्यात आले आहे. 

Web Title: Parents ... how to teach children how to teach this movie if you fall in love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.