पाउलो कोहेलो शाहरुखच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:09 IST2016-01-16T01:17:45+5:302016-02-06T12:09:41+5:30
अल्केमिस्ट', 'ब्राईड अँड इलेव्हन मिनिट्स' अशा जगभर गाजलेल्या पुस्तकांचे लेखक पाउलो कोहेलो यांनी शाहरुखचा 'माय नेम इज खान' हा ...

पाउलो कोहेलो शाहरुखच्या प्रेमात!
अ ्केमिस्ट', 'ब्राईड अँड इलेव्हन मिनिट्स' अशा जगभर गाजलेल्या पुस्तकांचे लेखक पाउलो कोहेलो यांनी शाहरुखचा 'माय नेम इज खान' हा चित्रपट या वर्षाच्या प्रारंभी पाहिला. त्यानंतर 'या वर्षात मी पाहिलेला सर्वात्कृष्ट चित्रपट' असं ट्विट त्यांनी केलं. शाहरुखचे आणखी चित्रपट पहायला आवडतील, असंही त्यांनी नमूद केलं. शाहरुखनं त्याला प्रतिसाद देताना ट्विट केलं, की सर तुमचा पत्ता मला कळवा. मी तुम्हाला प्रदर्शित झालेले चित्रपट पाठवण्याची व्यवस्था करतो. तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द आम्ही वाचत असतो. तुमचे वाचक म्हणून आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. शाहरुखनं पाठवलेल्या डीव्हीडी कोहेलो यांना नुकत्याच मिळाल्या. त्यांनी ट्विट केलंय, की मला ही सुंदर भेट मिळाली. आता कोणता चित्रपट आधी पहावा, हे मला ठरवावं लागेल.