'कोर्ट'ला बाजूला ठेवण्याचा पालेकरांचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:20:43+5:302016-01-24T16:34:43+5:30
केवळ रवैल यांनीच नव्हेतर आणखी एक ज्युरी सदस्य अरविंद सील यांनीही पालेकरांच्या मनमानी वृत्तीविरूद्ध वाचा फोडली आहे. आम्ही बैठकीमध्ये ...

'कोर्ट'ला बाजूला ठेवण्याचा पालेकरांचा प्रयत्न
क वळ रवैल यांनीच नव्हेतर आणखी एक ज्युरी सदस्य अरविंद सील यांनीही पालेकरांच्या मनमानी वृत्तीविरूद्ध वाचा फोडली आहे. आम्ही बैठकीमध्ये विविध टप्प्यावर मत घेत होतो. एका अंतरिम मतप्रक्रियेच्या दरम्यान मार्गरिटा विथ स्ट्रॉ, काका मुटटयी, मसान आणि कोर्ट या चार चित्रपटांच्या निकालामध्ये फेरफार करण्यात आले. जेव्हा शेवटच्या मतांची फेरतपासणी करण्यात आली, त्यात अमोल पालेकर यांनी चुकीचा निकाल जाहीर केल्याचे आढळले. बैठकीच्या मध्यंतरामध्ये चहासाठी ज्युरी सदस्य बाहेर गेले असता त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न त्यांची पत्नी संध्या गोखले करीत होत्या. त्यांच्या मते कोणताही मराठी चित्रपट ६0 टक्याच्यावर इंग्लिश मध्ये असू शकत नाही. 'कोर्ट' हा ७0 टक्के इंग्लिश मध्ये आहे. एका मराठी चित्रपट फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट रिजेक्ट झाला होता. त्यामुळे हा चित्रपटाची निवड कशी योग्य नाही हे सांगण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या.
दरम्यान एका वृत्तवाहिनीवर बोलताना अमोल पालेकर म्हणाले, 'फिल्म फेडरेशन' ही सर्व चित्रपटविषयक काम करणा-या संस्थांची बाप संस्था मानली जाते. ही एक स्वायत्त संस्था आहे. हीच संस्था देशभरातील निर्मात्यांकडून एंट्री मागविते. त्यातून छाननी न करता ते सगळे चित्रपट ऑस्करच्या निवड समितीच्या ज्युरीकडे पाठविते. यंदाच्या वर्षी ३0 चित्रपट आले होते. त्यामध्ये अगदी पीके, बाहुबली,बजरंगी भाईजान या चित्रपटांचा समावेश होता. यासाठी समितीकडे मग व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झालेले किंवा समांतर सिनेमे देखील पाठविले जातात. मात्र जो चित्रपट भारताचे दमदार नेतृत्व करेल अशा कलात्मक चित्रपटांची निवड समितीकडून केली जाते. 'कोर्ट' या निकषांवर बसल्यामुळे त्याची एकमताने निवड करण्यात आली.