​‘पाकिजा’च्या अभिनेत्रीची अशीही दुर्दशा; रूग्णालयात सोडून मुलगा झाला फरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 15:23 IST2017-05-28T09:49:28+5:302017-05-28T15:23:06+5:30

बॉलिवूडच्या १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाºया अभिनेत्री गीता कपूर यांची एक दुदैवी कहाणी समोर आली आहे.  गीता कपूर ...

Pakistan's actress is in such condition; Absconding absent from hospital! | ​‘पाकिजा’च्या अभिनेत्रीची अशीही दुर्दशा; रूग्णालयात सोडून मुलगा झाला फरार!

​‘पाकिजा’च्या अभिनेत्रीची अशीही दुर्दशा; रूग्णालयात सोडून मुलगा झाला फरार!

लिवूडच्या १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाºया अभिनेत्री गीता कपूर यांची एक दुदैवी कहाणी समोर आली आहे.  गीता कपूर यांचा पेशाने कोरिओग्राफर असलेला मुलगा राजा कपूर आपल्या ५८ वर्षांच्या आईला रूग्णालयात भरती करून फरार झाला आहे. 
 गत महिन्यात गीता कपूर यांची प्रकृती बिघडली. राजा कपूर याने यानंतर  एका खासगी रूग्णालयातून अ‍ॅम्बुलन्स मागवून गत २१ एप्रिलला त्यांनारूग्णालयात भरती केले. पण रूग्णालयात भरती केल्यानंतर राजा आपल्या आईकडे फिरकलाच नाही. ज्या घरात राजा कपूर राहायचा ते घरही त्याने सोडले आहे. गीता कपूर यांना एक मुलगीही आहे. ती एअर होस्टेस आहे. रूग्णालयाने या दोघांशी संपर्क साधला पण त्यांनी फोन उचलला नाही. गीता कपूर यांनी ही आपबीती सांगितली. त्यानी सांगितले की, काही दिवसांपूर्वी राजाने मला एका भाड्याच्या घरात शिफ्ट केले. तो मला मारायचा. चार दिवसांतून एकदा जेवण द्यायचा. मला खोलीत बंद करून ठेवायचा. मला वृद्धश्रमात राहायचे नव्हते. म्हणून त्याने मला रूग्णालयात सोडले अन् फरार झाला.





गीताचे डॉक्टर दीपेन्द्र त्रिपाठी यांनी सांगितले की, राजाने स्वत:ला आर्मी आॅफिसर सांगितले होते. गीता यांना रूग्णालयात भरती करून एटीएममधून पैसे काढून आणतो म्हणून तो गेला अन् परत आलाच नाही. गीता यांची प्रकृती गंभीर होती. म्हणून आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार केलेत.
गीता कपूर यांनी बॉलिवूडच्या १०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले आहे. गाजलेल्या ‘पाकिजा’ आणि ‘रजिया सुल्तान’ या चित्रपटातही त्या होत्या. गीता यांनी ‘पाकिजा’मध्ये राजकुमार यांच्या दुसºया पत्नीची भूमिका साकारली होती.



 गीता यांच्या प्रकृतीत आता बºयापैकी सुधारणा आहे. पण त्यांच्या उपचारावर लाखो रुपए खर्च झाले आहेत. गीता कपूर आता बºया आहेत. पण हे लाखो रूपयांचे बिल चुकवून त्यांना रूगालयातून घरी घेऊन जाणारे कुणीही नाही. अशात निर्माते रमेश तौरानी आणि अशोक पंडीत या दोघांनी गीता कपूर यांचे लाखो रूपयांचे बिल चुकवण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान रूग्णालयाने याप्रकरणी गत २ मे रोजी पोलिस तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप गीता यांचे कुटुंब कुठे आहे, याचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही.
 

Web Title: Pakistan's actress is in such condition; Absconding absent from hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.