Viral Video : म्हणे, सलमान छिछोरा, रितेश देखमुखनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 04:58 PM2023-03-05T16:58:39+5:302023-03-05T16:59:37+5:30

Pakistani Actress Saba Qamar : इरफान खानसोबत हिंदी मीडियम या झळकलेल्या सबा कमरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा तुफान व्हायरल होतोय.

pakistani actress saba qamar told salman khan chhichhora viral video | Viral Video : म्हणे, सलमान छिछोरा, रितेश देखमुखनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली?

Viral Video : म्हणे, सलमान छिछोरा, रितेश देखमुखनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली?

googlenewsNext

Pakistani Actress Saba Qamar : पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. इरफान खानसोबत हिंदी मीडियम या झळकलेल्या याच सबाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा तुफान व्हायरल होतोय.  2015 मध्ये सबा एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये सहभागी झाली होती. त्याचाच हा व्हिडीओ. या व्हिडीओवरून सबाला भारतीय सिनेप्रेमींनी जबरदस्त ट्रोल केलं होतं. कारणही तसंच होतं, सबा बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल नको ते बरळली होती. अगदी सलमान छिछोरा आहे, इमरान हाश्मीसोबत काम करून माउथ कँसर नाही करून घ्यायचा, रितेश देखमुखने कॉमेडीची वाट लावली, असं काय काय ती म्हणाली होती.

शोमध्ये तिला रणबीर कपूर, रितेश देशमुख, हृतिक रोशन, इमरान हाश्मी आणि सलमान खानचे फोटो दाखवत प्रत्येकाविषयी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. जेव्हा सलमानचा फोटो पडद्यावर आल्यानंतर सबाने त्याला छिछोरा म्हटलं होतं. "या अल्लाह माफ कर दे, सल्लू भैया से बहुत डर लगता है. बहुत छिछोरे है आप. वह किसी भी कोरियोग्राफर को बिल्कुल भी फॉलो नहीं करते हैं. वह अपने डांस स्टेप्स खुद ही इंवेंट करते हैं," असं सबा यावेळी म्हणाली होती.

इमरान हाश्मीसोबत काम करून माउथ कँसर नाही करून घ्यायचा...
शोमध्ये सबाला इमरान हाश्मीचा फोटो दाखवला असता तिने त्याच्यासोबत काम करायला लगेच नकार दिला. "मला माऊथ कॅन्सर करून घ्याचा नाही. त्यामुळे मी इमरानसोबत काम करणार नाही," असं ती म्हणाली. 

मी रितेश देशमुख सोबत...
 रितेश देशमुखचा फोटो येताच, तुला याच्यासोबत कॉमेडी सिनेमात काम करायला आवडेल का असा प्रश्न निवेदकाने सबाला विचारला. यावर, "मी रितेश देशमुख सोबत कॉमेडी करू शकत नाही. कॉमेडियन ॲक्टर म्हणून रितेशसोबत माझी चांगली केमिस्ट्री जुळणार नाही. रितेश मी पाकिस्तानात चांगलं काम केलंय.
मी इथे A लिस्टेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे कॉमेडी करताना पण बॉलिवूडमधला A क्लास अभिनेता मला हवाच.." असं ती म्हणाली होती.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सबा प्रचंड ट्राेल झाली होती. अखेर प्रकरण वाढल्यानंतर तिला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.  'मी या शोमध्ये जे काही बोलले ते फक्त मनोरंजनासाठी होते. सलमान मोठा स्टार आहे, असं म्हणत तिने घूमजाव केलं होतं.    

Web Title: pakistani actress saba qamar told salman khan chhichhora viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.