​पाकी अभिनेत्री सबा कमर बरळली, ‘दबंग खान’ सलमानची उडवली टर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 06:09 AM2017-02-17T06:09:27+5:302017-02-17T11:40:57+5:30

फवाद खान आणि माहिरा खान यांच्यापाठोपाठ पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. पण पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने मात्र सलमानला ‘टोटल रिजेक्ट’ केलयं. होय, अलीकडे एका टॉक शोमध्ये सबा सलमानबद्दल अशी काही बोलून गेली की, बडे बडे असे काही बोलताना चारदा विचार करतील.

Paki actress Saba Kamar Bawlali, 'Dabang Khan' Salman fighter! | ​पाकी अभिनेत्री सबा कमर बरळली, ‘दबंग खान’ सलमानची उडवली टर!

​पाकी अभिनेत्री सबा कमर बरळली, ‘दबंग खान’ सलमानची उडवली टर!

googlenewsNext
ाद खान आणि माहिरा खान यांच्यापाठोपाठ पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर ही सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे. पण बॉलिवूड डेब्यूूपूर्वीच सबाने बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानला डिवचले आहे. खरे तर सलमानसोबत काम करण्यासाठी बड्या बड्या हिरोईन अगदी तरसतात. त्याच्यासोबत काम करण्यास स्वत:चा सन्मान मानतात. पण पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने मात्र सलमानला ‘टोटल रिजेक्ट’ केलयं. होय, अलीकडे एका टॉक शोमध्ये सबा सलमानबद्दल अशी काही बोलून गेली की, बडे बडे असे काही बोलताना चारदा विचार करतील. 



एका टॉक शोमध्ये सबाला काही प्रश्न विचारण्यात आले. तिला बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांचे फोटो दाखवून त्यांच्याबरोबर काम करण्याची आॅफर नाकारण्यास व त्यामागचे कारण सांगण्यास सांगितले. सबा अनेक बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल नाही नाही ते बरळली. हृतिक रोशनसोबत मी काम करणार नाही, कारण तो माझ्या टाईपचा नाही. तो दोन मुलांचा बाप आहे, असे सबा म्हणाली. इमरान हाश्मीचा फोटो तिला दाखवण्यात आला, यावर मला तोंडाच्या कर्करोगाला निमंत्रण द्यायचे नाही, असे ती म्हणाली. यानंतर होस्टने तिला सलमान खानचा फोटो दाखवला. यावर तर सबाने अतिरेकच केला. सल्लू भाईची मला फार भीती वाटते. नाही बाबा, तो भलताच ‘छिछोरा’आहे. ना त्याची कुठलीही स्टाईल आहे, ना त्याला नाचता येत, असे सबा बोलून गेली. रितेश देशमुखला सबाने बी-ग्रेड हिरोच्या रांगेत नेऊन बसवले. बॉलिवूड अभिनेत्यांविरूद्ध सबाने दिलेल्या प्रतिक्रियांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



सबा कमर लवकरच अभिनेता इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या कॉमेडी चित्रपटाची शूटींग दिल्लीला झाली.

ALSO READ : ​इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक
पाकिस्तानी सबा बनणार इरफानची हिरोईन

Web Title: Paki actress Saba Kamar Bawlali, 'Dabang Khan' Salman fighter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.