पद्मावतीचे नवे पोस्टर रिलीज.. दीपिका पादुकोणच्या सौंदर्यावरुन नजरा हटवणे झाले कठिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 15:39 IST2017-11-08T10:09:30+5:302017-11-08T15:39:30+5:30

आम्हाला माहीत आहे की भव्यदिव्य सेट आणि सुंदरतेने बनवलेल्या पद्मावती चित्रपट पाहण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली आहे. पद्मावतीच्या भूमिकेत ...

Padmavati releases new poster .. Deepika Padukone | पद्मावतीचे नवे पोस्टर रिलीज.. दीपिका पादुकोणच्या सौंदर्यावरुन नजरा हटवणे झाले कठिण

पद्मावतीचे नवे पोस्टर रिलीज.. दीपिका पादुकोणच्या सौंदर्यावरुन नजरा हटवणे झाले कठिण

्हाला माहीत आहे की भव्यदिव्य सेट आणि सुंदरतेने बनवलेल्या पद्मावती चित्रपट पाहण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागली आहे. पद्मावतीच्या भूमिकेत असलेली दीपिका पादुकोणचे तिच्या लूकबद्दल चर्चा होत असताना चित्रपट निर्मात्यांनी पाहिले गाणे (घुमर) रिलीज केल्यानंतर  पद्मावतीचे आणखी पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या  पोस्टर मध्ये दीपिका खूपच सुंदर आणि अतिशय मोहक अंदाजात दिसते आहे. हा पोस्टर बघितल्यानंतर तुमच्या नजरा तिच्यावर खिळून राहितील यात काही शंका नाही. दीपिकाने या चित्रपटात तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा.   

नवीन रिलीज झालेल्या पोस्टर मध्ये दीपिका जरीचे काम केलेली साडी नेसली आहे आणि भरजरी दागिने सुद्धा तिने घातले आहेत. तिच्या आसपास खूप राजपूत महिला दिसतायेत मात्र यातही दीपिका घाबरलेली दिसते आहे तिच्या हातात काहीतरी आहे. पण ते काय आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.या  पोस्टरमध्ये अजून एक गोष्ट तुमचे लक्ष वेधून घेऊन शकते ती म्हणजे चित्रपटाची रिलीज डेट  १ डिसेंबर नसून ३० नोव्हेंबर लिहिण्यात आली आहे. यावरुन अंदाज लावू शकतो की चित्रपट कदाचित वेळेच्या आधी रिलीज केला जाणार आहे.  

पद्मावती हा चित्रपट मेवाडची राणी पद्मावतीच्या च्या जीवनावर आधारित आहे. १२ व्या आणि १३ व्या शतकात मेवाडवर  हल्ले झाले आणि यात अलाऊद्दीन खिल्जीच्या  राणी पद्मावतीच्या सौंदर्यांवर मोहित झाला. एकेदिवशी त्याने मेवाडवर हल्ला करायचे ठरवले पण तो राणी पद्मावतीला बंदी बनवण्यास अयशस्वी ठरला. यात अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिका रणवीर सिंग साकारतो आहे. तर पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत म्हणजेच राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.  हा चित्रपट अमेरिकेत सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 

ALSO READ :  ​या प्रश्नावर केली दीपिका पादुकोणने सगळ्यांची बोलती बंद

Web Title: Padmavati releases new poster .. Deepika Padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.