या दिवशी अमेरिकेत रिलीज होणार 'पद्मावती'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 11:59 IST2017-11-02T06:28:51+5:302017-11-02T11:59:17+5:30
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट पद्मावती अमेरिकेत सुद्धा रिलीज होणार आहे. हा चित्रपट अमेरिकेत एक डिसेंबरला रिलीज करण्यात ...
.jpg)
या दिवशी अमेरिकेत रिलीज होणार 'पद्मावती'
स जय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट पद्मावती अमेरिकेत सुद्धा रिलीज होणार आहे. हा चित्रपट अमेरिकेत एक डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरची यात मुख्य भूमिका आहे. हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यात तो राणी पद्मावतीचा पती म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे आणि रणवीर सिंग अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत झळकणार आहे. भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
दीपिकाच्या या लूकचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने या लूकमध्ये तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा. या चित्रपटातूल पहिले गाणं घूमर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची चांगलीच चर्चा झाली. ‘घूमर’मधील दीपिकाचा अंदाज पाहण्याजोगा आहे. दीपिकाच्या या घाग-याचे वजन ११ किलो होते. रिलीज झाल्यानंतर पाच दिवसात या गाण्याला तीन कोटींवर लोंकांनी पाहिले होते. ‘घूमर’ हा एक राजस्थानी नृत्य प्रकार आहे. दीपिकाचे हे गाणे तुम्ही पाहिले असेल तर त्यात दोन चेहरे आणखी दिसतात. एक म्हणजे महारावल रतन सिंगच्या भूमिकेतील शाहिद कपूर आणि दीपिकाची ‘सौतन’ बनलेली अनुप्रिया. अनुप्रिया या चित्रपटात राणी नागमतीच्या भूमिकेत दिसणार आहे.
ALSO RAED : रिलीजआधी ‘पद्मावती’वर चालणार कात्री! जाणून घ्या यामागचे कारण!!
पद्मावतीसाठी इतर कलाकारांपेक्षा दीपिका पादुकोणला जास्त मानधन मिळाले होते. शाहिद कपूरने यातील राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारण्यासाठी सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. रणवीर सिंगने ही आपली भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहातायेत.