PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळींनी घेतली जयपूरमध्ये कधीच शूटींग न करण्याची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 13:57 IST2017-01-29T08:24:36+5:302017-01-29T13:57:32+5:30

हल्ल्यामुळी कष्टी झालेल्या भंसाळींनी सगळी शूटींग रद्द करून पुन्हा कधीच जयपूरला चित्रिकरण न करण्याची शपथ घेतली. चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिलजी यांचा रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार अशी चर्चा ऐकून राजपूत संघटना ‘करणी सेने’ने जयपूर येथे जयगढ किल्ल्यावर सुरू असणाऱ्या शूटींगमध्ये तोडफोड केली.

PADMAVATI ASSAULT: Sanjay Leela Bhansali never sworn in to shoot in Jaipur | PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळींनी घेतली जयपूरमध्ये कधीच शूटींग न करण्याची शपथ

PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळींनी घेतली जयपूरमध्ये कधीच शूटींग न करण्याची शपथ

द्मावती’ चित्रपटाच्या सेटवर ‘करणी सेने’च्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भंसाळींनी जयपूर शहरात यापुढे कधीच शूटींग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांकडून कळतेय. चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिलजी यांचा रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार अशी चर्चा ऐकून राजपूत संघटना ‘करणी सेने’ने जयपूर येथे जयगढ किल्ल्यावर सुरू असणाऱ्या शूटींगमध्ये तोडफोड केली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सगळीकडे फिरतोय. भंसाळींनाही यामध्ये मारहाण केल्याचे स्पष्ट दिसते. अशा प्र्रकारच्या हल्ल्यामुळी कष्टी झालेल्या भंसाळींनी सगळी शूटींग रद्द करून पुन्हा कधीच जयपूरला चित्रिकरण न करण्याची शपथ घेतली असल्याचे समजेय.

ALSO READ: अनुराग कश्यपला करण जोहरसोबत न झोपण्याचा सल्ला देणाऱ्याला करणने केले त्याच्याच शब्दात गप्प!

इतिहासाचे चुकीचे संदर्भ दाखवून एका काल्पनिक सीनमध्ये पद्मावती व खिलजीचा रोमान्स दाखवण्यात येणार असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. राणी पद्मावती यांचे असे अपमानास्पद चित्रणाला त्यांचा विरोध आहे; परंतु निर्माते व सर्व प्रमुख कलाकार दीपिका (पद्मावती), रणवीर सिंग (अल्लाउद्दीन खिलजी) आणि शाहीद कपूर (रावल रतन सिंग) यांनी अशा प्रकारचा कोणताच सीन चित्रपटात नसल्याचे सांगितले.

                                 

करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंग कल्वी यांनी हल्ल्याचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन देताना म्हटले की, ‘आम्ही हिंसेला पाठिंबा देत नाही परंतु आम्ही तेथे केवळ भंसाळींची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशी चर्चा करून आमचे म्हणने मांडण्याचा आमचा हेतू होता. परंतु त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी अरेरावी करत हवेत तीन गोळ्या झाडल्या आणि परिस्थिती चिघळली.’

ALSO READ: संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड

एवढेच नाही तर आम्ही आमचा विरोध सहा महिन्यांपूर्वीच भंसाळींना कळविला असल्याचे त्यांनी सांगितले. रणवीर सिंगने दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देऊन त्यांनी पद्मावती राणीचे चुकीचे दर्शन चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे आम्हाला कळाले होते, अशी माहिती दिली. अद्याप स्वत: भंसाळींनी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: PADMAVATI ASSAULT: Sanjay Leela Bhansali never sworn in to shoot in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.