PADMAVATI ASSAULT: अखेर वाद शमला! ‘पद्मावती’चे बदलणार नाव !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 17:33 IST2017-01-31T12:02:04+5:302017-01-31T17:33:32+5:30

‘पद्मावती’ या आगामी सिनेमावरून निर्माण झालेले वादळ अखेर शांत झालेय. होय, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि करणी सेना यांच्यात ...

PADMAVATI ASSAULT: Finally the talk! Name changed to 'Padmavati' !! | PADMAVATI ASSAULT: अखेर वाद शमला! ‘पद्मावती’चे बदलणार नाव !!

PADMAVATI ASSAULT: अखेर वाद शमला! ‘पद्मावती’चे बदलणार नाव !!

द्मावती’ या आगामी सिनेमावरून निर्माण झालेले वादळ अखेर शांत झालेय. होय, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि करणी सेना यांच्यात समझौता झाल्याचे कळतेय.  चर्चेदरम्यान करणी सेनेचे सर्व मतभेद दूर करण्यात भन्साळींच्या टीमला यश आले आहे. भन्साळींच्या टीमने एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली. चित्रपटासंदर्भात आता कुठलाही वाद राहिलेला नाही. सेनेने चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. भन्साळींची नाव बदण्यास कुठलीही हरकत नाही, असे टीमने सांगितले. अर्थात एका टिष्ट्वटमध्ये करणी सेनेने रिलीजपूर्वी ‘पद्मावती’ दाखवला जावा, अशी एक मागणीही केली आहे. याबद्दलचा तपशील कळू शकला नाही.

ALSO READ :संजय लीला भंसाळींनी घेतली जयपूरमध्ये कधीच शूटींग न करण्याची शपथ
ऐतिहासिक चित्रपटांवरुन उद्भवलेले वाद

  भन्साळी प्रॉडक्शनच्या सीईओ शोभा संत यांनी करणी सेनेचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपटात अलाउद्दिन खिल्जी आणि राणी पद्मावती यांच्यात कुठलाही आक्षेपार्ह सीन नाही, असे संत यांनी म्हटले आहे. शिवाय करणी सेनेला तसे लेखी आश्वासन दिले आहे. आम्ही या चित्रपटासाठी बराच रिसर्च केला आहे. आमचा चित्रपट बघून लोकांना या चित्रपटाचा अभिमान वाटेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. आमची प्रॉडक्शन टीम आणि चित्रपटाच्या कलाकारांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचता कामा नये, असे आम्हाला वाटते, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘पद्मावती’ चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिल्जी यांच्यात रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार,अशी चर्चा ऐकून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला होता. शिवाय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण केली होती. या वादानंतर ‘पद्मावती’चे चित्रीकरण अडचणीत सापडले होते. मात्र भन्साळींनी ‘पद्मावती’चे नाव बदलण्याची तयारी दर्शवल्यावर हा वाद निकाली निघाला आहे.

Web Title: PADMAVATI ASSAULT: Finally the talk! Name changed to 'Padmavati' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.