PADMAVATI ASSAULT: अनुराग कश्यपला करण जोहरसोबत न झोपण्याचा सल्ला देणाऱ्याला करणने केले त्याच्याच शब्दात गप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 12:40 IST2017-01-29T07:10:33+5:302017-01-29T12:40:33+5:30

करण जोहर आणि अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावरील ‘कथित’ संस्कृती रक्षकांच्या हिटलिस्टवर आहेत. ‘पद्मावती’च्या सेटवर दिग्दर्शक संजय लीला भंसाळी ...

PADMAVATI ASSAULT: Anurag Kashyap, in the words of the person who did not sleep with Johar, was silent in his own words! | PADMAVATI ASSAULT: अनुराग कश्यपला करण जोहरसोबत न झोपण्याचा सल्ला देणाऱ्याला करणने केले त्याच्याच शब्दात गप्प!

PADMAVATI ASSAULT: अनुराग कश्यपला करण जोहरसोबत न झोपण्याचा सल्ला देणाऱ्याला करणने केले त्याच्याच शब्दात गप्प!

ण जोहर आणि अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावरील ‘कथित’ संस्कृती रक्षकांच्या हिटलिस्टवर आहेत. ‘पद्मावती’च्या सेटवर दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेची निंदा करत हे दोघे समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

अनुराग कश्यपने ट्विट केले की, ‘हिंदू दहशतवाद आता केवळ सोशल मीडियापूरता मर्यादित राहिलेला नसून प्रत्यक्षातही दिसून येत आहे. भंसाळीवर झालेला हल्ला त्याचेच द्योतक आहे.’ अनुरागच्या ‘हिंदू दहशतवादा’च्या मुद्याला धरून लागलीच त्याच्यावर ट्विटरवर टीका सुरू झाली. अत्यंत अर्वाच्य शब्दांत त्याला शिव्या घालण्यात येऊ लागल्या.
 एका यूजरने तर अनुरागला सल्ला दिला की, तु करण जोहरसोबत झोपणे बंद कर. पण त्याला खुद्द करण जोहरने त्याच्याच शब्दात गप्प करून कमालच केली. करणने त्या यूजरला प्रतिसल्ला दिला की, ‘अरे नैरश्यपूर्ण माणसा...तु एक काम कर...तुच कोणासोबत तरी झोपाण्यास सुरूवात कर.’ करणच्या असा क्लासिक रिप्लाय वाचून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
 आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात येत असून राणी पद्मावतीचे अपमानास्पद चित्रण केले जात असल्याचा आक्षेप घेत ‘करणी सेने’च्या कार्यक र्त्यांनी जयपूर येथे सुरू असलेल्या शूटींगमध्ये धुमाकूळ घातला. सेटवरी सामानाची तोडफोड करण्याबरोबरच भंसाळी यांनादेखील मारहाण करण्यात आली. या घटनेचे तीव्र प्रतिसाद सध्या उमटत आहेत.

करण जोहरने निषेध नोंदवत म्हटले होते की, ‘स्वानुभवातून मी समजू शकतो की, भंसाळी सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत. आत हीच वेळ आहे सगळ्या बॉलीवूडने एकत्र येण्याची.’ अनुरागनेदेखील भंसाळींना समर्थन देत इंडस्ट्रीला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. इतर अनेक सेलिब्रेटींनीसुद्धा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याची निंदा केली.

ALSO READ: ​संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड

Web Title: PADMAVATI ASSAULT: Anurag Kashyap, in the words of the person who did not sleep with Johar, was silent in his own words!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.