‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 12:38 PM2018-02-04T12:38:49+5:302018-02-04T21:15:23+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. चित्रपटात रणवीर सिंगच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक ...

'Padmavat' Ranveer and Shahid's highest grossing film career! | ‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

‘पद्मावत’ ठरला रणवीर अन् शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!

googlenewsNext
जय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. चित्रपटात रणवीर सिंगच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक केले जात आहे. या चित्रपटात त्याने अल्लाउद्दीन खिलजीची अतिशय क्रूर खलनायकाची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कलेक्शन केले, त्यावरून हा चित्रपट रणवीरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ने बॉक्स आॅफिसवर १८८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर ‘पद्मावत’ने आतापर्यंत १९२ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली आहे. 

चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शाहिद कपूर चित्रपटात राजा रावल रतन सिंग यांच्या भूमिकेत आहे. तर दीपिकाने राणी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने या चित्रपटाशी संबंधित काही कमाईचे आकडे त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले. तरणने लिहिले की, ‘पद्मावत’च्या कमाईत दुसºया शनिवारी जबरदस्त प्रगती होताना दिसली त्यामुळे रविवारी हा चित्रपट दोनशे कोटी रुपयांचा आकडा सहज पार करेल, अशी शक्यता आहे. 
 
तरणने लिहिले की, रणवीर सिंग आणि शाहिद कपूूरच्या करिअरमधील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. जर या चित्रपटाने चेन्नई एक्स्प्रेसचे रेकॉर्ड ब्रेक केल्यास दीपिका पादुकोणच्याही करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरणार आहे. दीपिका पादुकोणच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर २२६ कोटी ७० लाख इतकी कमाई केली होती. ‘पद्मावत’ हे रेकॉर्ड ब्रेक करेल, असेच एकूण चित्र दिसत आहे. 

Web Title: 'Padmavat' Ranveer and Shahid's highest grossing film career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.