Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:30 IST2017-12-20T10:00:49+5:302017-12-20T15:30:49+5:30

आर. बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज झाले. ‘आज से तेरी’ असे या गाण्याचे बोल आहेत.

Padman song Aaj Se Teri: !! Look, Akshay Kumar - Radhika Apte's romantic style! | Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!

Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!

त्या २६ जानेवारीला रिलीज होत असलेल्या  आर. बल्की दिग्दर्शित ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज झाले. ‘आज से तेरी’ असे या गाण्याचे बोल आहेत. अरिजीतने गायलेल्या या गाण्याला संगीत दिले आहे  अमित त्रिवेदी याने. या रोमॅन्टिक गाण्यात अक्षय कुमार व अभिनेत्री राधिका आपटे दोघेही लग्नाच्या आणाभाका घेताना दिसत आहेत. या गाण्यात नवरदेव बनलेल्या अक्षयने पांढरा कुर्ता घातलेला आहे. तर राधिकाही नववधूच्या वेशात सुंदर दिसतेय. गाण्यात अक्षय व राधिकाची केमिस्ट्री अफलातून आहे. अक्षय कुमारने त्याच्या सोशल अकाऊंटवर  या गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. सोबतच या फोटोला सुंदर कॅप्शन देताना लग्नाची सुंदर सहज व्याख्याही केली होती. ‘Marriage is finding innovative ways and not just words to say I love you!’, असे त्याने लिहिले होते. यानंतर काही तासांत अक्षयने गाणे रिलीज केले. अक्षय व राधिकाचे हे रोमॅन्टिक गाणे तुम्हीही पाहायलाच हवे.



ALSO READ : अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’चा ट्रेलर आऊट झाला होता. ‘सुपरहिरो है ये पगला’अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिरवणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून सामाजिक विषयाला वाहिलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपटदेखील याच पठडीतला चित्रपट आहे. यापूर्वी अक्षय ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही असाच  सामाजिक विषयाला वाहिलेला होता. 

Web Title: Padman song Aaj Se Teri: !! Look, Akshay Kumar - Radhika Apte's romantic style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.