​पी. व्ही. सिंधूचे बायोपिक दीपिका पादुकोण करणार की नाही? जाणून घ्या उत्तर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 14:30 IST2017-05-07T09:00:07+5:302017-05-07T14:30:07+5:30

दीपिका पादुकोण सध्या भन्साळींच्या चित्रपटात बिझी आहे. पण आल्या दिवशी दीपिकाने वेगवेगळे चित्रपट साईन केल्याची बातमी येऊन धडकते. अलीकडे ...

P. V. Will Deepika Padukone Deepika Padukone? Know the Answer! | ​पी. व्ही. सिंधूचे बायोपिक दीपिका पादुकोण करणार की नाही? जाणून घ्या उत्तर !

​पी. व्ही. सिंधूचे बायोपिक दीपिका पादुकोण करणार की नाही? जाणून घ्या उत्तर !

पिका पादुकोण सध्या भन्साळींच्या चित्रपटात बिझी आहे. पण आल्या दिवशी दीपिकाने वेगवेगळे चित्रपट साईन केल्याची बातमी येऊन धडकते. अलीकडे बातमी आली ती दीपिकाने एक बायोपिक साईन केल्याची. दीपिका भारतीय बॅटमिंटनपटू सायना नेहवालची व्यक्तिरेखा साकारणार, अशी बातमी मध्यंतरी आली. पण काहीच दिवसानंतर हे बायोपिक श्रद्धाच्या झोळीत पडल्याचे ऐकीवात आले.
बायोपिक आणि दीपिकाचे कनेक्शन इथेच थांबले नाही, मग तिचे नाव आॅलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवणा-या पी. व्ही. सिंधूशी जोडले गेले. आता खरे काय हे शेवटी दीपिकाच सांगू शकणार. अलीकडे एका इव्हेंटमध्ये दीपिकाने यावर उत्तर दिलेच. या सगळ्या बातम्या अफवा असल्याचे ती म्हणाली. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला कुठल्याी बायोपिकची आॅफर मिळालेली नाही. होय, माझे बॅकग्राऊंड बॅडमिंटनशी संबंधित आहे. पण मला अद्याप कुठलीही आॅफर मिळालेली नाही, असे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले.
पी. व्ही. सिंधूचे बायोपिक अभिनेता सोनू सूद प्रोड्यूस करतोय. तूर्तास त्यानेही या चित्रपटातील स्टारकास्ट जाहिर केलेली नाही. पण दीपिकाने मात्र स्पष्ट केलेय. ती या कुठल्याही बायोपिकमध्ये नाहीय, हे तिने सांगून टाकलेय.

ALSO READ : प्रियांका चोप्राच्या नावामुळे संतापली दीपिका पादुकोण!

पी. व्ही. सिंधू ही २१ वर्षांची बॅडमिंटनपटू बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये तिसºया क्रमांकावर आहे. २०१६ च्या आॅलम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. सिंधूच्या भूमिकेत दीपिकाला पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत तरी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्तास दीपिका ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: P. V. Will Deepika Padukone Deepika Padukone? Know the Answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.