​ संजय पटेलला ‘आॅस्कर’ने दिला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:58 IST2016-02-28T11:58:57+5:302016-02-28T04:58:57+5:30

भारतीय वंशाचे चित्रपट निर्मात संजय पटेल यांचा अ‍ॅनिमेटेड लघुपट  'Sanjay's Super Team'  ला आॅस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. हे वृत्त ...

'Oscars' gave Sanjay Patel a surprise push | ​ संजय पटेलला ‘आॅस्कर’ने दिला आश्चर्याचा धक्का

​ संजय पटेलला ‘आॅस्कर’ने दिला आश्चर्याचा धक्का


/>भारतीय वंशाचे चित्रपट निर्मात संजय पटेल यांचा अ‍ॅनिमेटेड लघुपट  'Sanjay's Super Team'  ला आॅस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. हे वृत्त ऐकून खुद्द संजयला आश्चर्याचा धक्का बसला आहे. आॅस्करसाठी नामांकन मिळणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असल्याचे संजयने म्हटले आहे. मी खरचं आश्चर्यचकीत झालो. आॅस्करमध्ये नामांकन मिळणे अतिशय कठीण असते. अशास्थितीत माझे भाग्य फळफळत असेल तर माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. अन्य २४ श्रेणींमध्ये या लघुपटास नामांकन देण्याबाबत उद्या सोमवारी निर्णय होणार आहे.
सात मिनिटाच्या या लघूपटात पित्याच्या धार्मिक मान्यतांना कंटाळलेल्या आणि हिंदू देवतांच्या सुपरहिरोची छबीची कल्पना मनात रंगवणाºया एका युवा भारतीयाची कहानी आहे.मोनस्टर यूनिवसिर्टी’, ‘द इन्के्रडिबल्स’, ‘रैटाटुई’ आणि ‘टॉय स्टोरी २’ यासारख्या यशस्वी अ‍ॅनिमेटेड चित्रपटांत योगदान देणाºया संजय यांना आपल्या लहानपणींच्या अनुभवातून या लघूपटाचा विषय सुचला.

Web Title: 'Oscars' gave Sanjay Patel a surprise push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.