न्यूड कॅटवॉक करण्यास सांगितले होते या अभिनेत्रीला, 'द लास्ट विश' या शॉर्टफिल्ममध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 06:00 AM2019-10-09T06:00:00+5:302019-10-09T06:00:00+5:30

ही अभिनेत्री बोल्डनेसमुळे असते चर्चेत

one person said Sherlyn Chopra to Nude catwalk , revealed in the short film 'The Last Wish' | न्यूड कॅटवॉक करण्यास सांगितले होते या अभिनेत्रीला, 'द लास्ट विश' या शॉर्टफिल्ममध्ये केला खुलासा

न्यूड कॅटवॉक करण्यास सांगितले होते या अभिनेत्रीला, 'द लास्ट विश' या शॉर्टफिल्ममध्ये केला खुलासा

googlenewsNext

अभिनेत्री शर्लिन चोप्रा अलीकडेच रॅपर, कॉन्टेंट क्रिएटर व निर्मातीदेखील बनली आहे. काही दिवसांपूर्वी शर्लिनने एक रॅप साँग लाँच केलं. या गाण्याचं खूप कौतूक झालं. या गाण्यानंतर तिला बऱ्याच प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत आणि ती सध्या बिझी आहे. मात्र आता शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत एक शॉर्टफिल्म रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्टफिल्मचं नाव आहे द लास्ट विश. 


द लास्ट विश शॉर्टफिल्ममध्ये शर्लिनने एका मुलावर मनापासून प्रेम केले होते. या प्रेमात तिला धोका मिळाला. तिच्या या शॉर्टफिल्मचा टीझर प्रदर्शित केला आहे ज्यात ती स्वतः सांगते आहे की, ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच न्यूड कॅटवॉक करायला सांगितलं. आता तोच माझ्यासाठी काम करतो आहे. माझा जीवन प्रवास पहा द लास्ट विशमध्ये. 


तिने आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं की,  “एक अभिनेता आणि निर्माता म्हणून मी माझा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सीरिज सुरू करणार आहे. ही वेब सीरिज वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजचे संकलन असेल आणि प्रत्येक कथेत तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखेत आणि एका नवीन अवतारात पाहू शकणार आहे.


शर्लिन चोप्राने कामसूत्रा, वजाह तुम हो, हडिप्पासारख्या चित्रपटात काम केले आहे.

द लास्ट विशमधून शर्लिनच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहे आणि ही शॉर्टफिल्म डिसेंबरमध्ये ‘द शर्लिन चोप्रा अ‍ॅप’ वर लाँच केली जाईल.
 

Web Title: one person said Sherlyn Chopra to Nude catwalk , revealed in the short film 'The Last Wish'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.