OMG!! शेअर केला शर्टलेस फोटो अन् ‘अंडरवीअर’वरून ट्रोल झाला वरूण धवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 10:22 IST2017-09-13T04:50:57+5:302017-09-13T10:22:03+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होणाºया सेलिब्रिटींच्या यादीत आता अभिनेता वरूण धवन याचे नावही सामील झाले आहे. आश्चर्य म्हणजे, आता टोलर्स ...

OMG !! Varun Dhawan gets shoved with shirtless photo and underwear | OMG!! शेअर केला शर्टलेस फोटो अन् ‘अंडरवीअर’वरून ट्रोल झाला वरूण धवन!

OMG!! शेअर केला शर्टलेस फोटो अन् ‘अंडरवीअर’वरून ट्रोल झाला वरूण धवन!

शल मीडियावर ट्रोल होणाºया सेलिब्रिटींच्या यादीत आता अभिनेता वरूण धवन याचे नावही सामील झाले आहे. आश्चर्य म्हणजे, आता टोलर्स अगदीबालिश कारणांवरूनही सेलिब्रिटींना ट्रोल करू लागले आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे वरूण धवन. वरूण धवन कशावरून ट्रोल झाला, हे ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.
वरूण धवनचा ‘जुडवा2’लवकरच येतोय, हे तुम्हाला ठाऊक आहेच. वरूण सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनचा एक फंडा वरूणनेही वापरला. त्याने बुडापेस्ट येथून एक शर्टलेस फोटो  शेअर केला आणि मग काय,टोलर्सला वरूणला ट्रोल करण्याची संधी मिळाली. त्यांनी वरूणला लक्स कोजीची अंडरवीअर घातल्यावरून ट्रोल केले.


वरूणच्या फोटोत लक्स कोजीचा टॅग दिसतोय. यावरून ट्रोलर्सनी वरूणला लक्ष्य केले. वरूण धवन इतकी स्वस्त इनरवेअर घालतो, असे म्हणून कुणी त्याची खिल्ली उडवली तर कुणी फ्रीमध्ये लक्स कोजीची जाहिरात केल्याचे सांगून त्याची टर उडवली.



अर्थात या ट्रोल करणाºयांना वरूणने फार गंभीरपणे घेतले नाही. पण बरेच ट्रोलर्सला तेव चढलेला पाहून त्यानेही प्रतिक्रिया दिली. अर्थात तीही मोठी मजेशीर. त्याच्या त्या उत्तराने सगळ्यांचीच बोलती बंद केली. ‘बहुत कंफर्टेबल और अफोर्डेबल है. भाई राजा को पसंद है,’ असे वरूणने लिहिले.




ALSO READ : पाहा, ‘जुडवा2’चा धमाकेदार ट्रेलर...!!

१९९७ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या सुपरहिट चित्रपटात सलमान खानने दुहेरी भूमिका केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल पुन्हा तयार करण्यात येत  आहे. विशेष म्हणजे, या सीक्चलमध्येही तुम्हा-आम्हाला सलमान खान  पाहायला मिळणार आहे. अर्थात केवळ दोन मिनिटांसाठी. होय, सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमान चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दिसणार आहे, तेही ठीक क्रेडिटच्या आधी. वरूण धवनचे डबल कॅरेक्टर राजा आणि प्रेम एका हॉटेलमध्ये रिअल राजा व प्रेम म्हणजेच सलमानला  भेटतात, असा हा सीन असेल. यात सलमान व वरूणचा एखाद-दुसरा संवाद आहे.  ‘उंची है बिल्डिंग’ आणि ‘टन टना टन...’ही दोन गाजलेली गाणीही ‘जुडवा2’मध्ये दिसणार असल्याचे कळतेय.   येत्या वर्षात दसºयाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: OMG !! Varun Dhawan gets shoved with shirtless photo and underwear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.