OMG !! ​बहीण कृष्णाला का चादरीत झाकून ठेवू इच्छितो टायगर श्रॉफ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 10:21 IST2017-07-30T04:50:52+5:302017-07-30T10:21:27+5:30

टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. पण या चित्रपटाने एक मात्र झाले. काय तर, लोक ...

OMG !! Tiger Shroff wants to cover sister Krishna? | OMG !! ​बहीण कृष्णाला का चादरीत झाकून ठेवू इच्छितो टायगर श्रॉफ?

OMG !! ​बहीण कृष्णाला का चादरीत झाकून ठेवू इच्छितो टायगर श्रॉफ?

यगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. पण या चित्रपटाने एक मात्र झाले. काय तर, लोक टायगरच्या डान्सचे चांगलेच ‘दिवाने’ झालेत. त्यामुळे टायगरसाठी हा चित्रपट ‘फ्लॉप’ ठरला, असे म्हणता येणारच नाही. या चित्रपटाने टायगरला खूप मोठे फॅन फॉलोर्इंग दिले, अपार लोकप्रीयता दिली. त्यामुळे लोकांना टायगरबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे. तर चला, आज आम्ही तुम्हाला टायगरच्या स्वभावाविषयी सांगतो. टायगर स्वभावाने अतिशय नम्र आणि काहीसा लाजाळू आहे, हे तुम्ही जाणताच. पण याशिवाय टागयर बराच ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह’ही आहे. होय, रिल लाईफमध्ये तो जितका बिनधास्त दिसतो, रिअल लाईफमध्ये तितकाच ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह’ आहे. विश्वास बसत नसेल तर, बहिणीबद्दल टायगर जे काही बोलला ते वाचा. 



अलीकडे एका मुलाखतीत टायगरला त्याची बहीण कृष्णा हिच्याबद्दल विचारण्यात आले. यावर टायगर जे बोलला, ते ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. ‘मला माझ्या बहिणीला कायम चादरीने झाकून ठेवायला आवडेल. एक भाऊ म्हणून मी कमालीचा ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह’ आहे. मला माहित आहे, माझे हे विचार ऐकूल लोक मला सेक्सिस्ट म्हणतील. माझ्यावर टीका होईल. पण मला याची अजिबात पर्वा नाही,’ असे टायगर  म्हणाला.



ALSO READ : कृष्णा श्रॉफने पुन्हा शेअर केले ब्लॅक बिकिनी फोटोज्!!

काही दिवसांपूर्वी टायगरच्या याच लाडक्या बहिणीने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवरून कृष्णाला बरेच ट्रोल व्हावे लागले होते. पण टायगरने यावर मौन बाळगणे पसंत केले होते. असे का? असा एक प्रश्नही टायगरला या मुलाखतीत विचारला गेला. या प्रश्नावरही टायगर बोलला. कृष्णाच्या त्या फोटोवर मी कुठलेच स्टँड घेतले नाही. कारण मला त्यात काहीही चुकीचे वाटले नव्हते. अनेक लोक फोटोशूट करतात आणि आपले फोटो शेअर करतात. कृष्णाला काय शेअर करायचे, काय नाही, हा तिच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. प्रत्येकाजवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लोक तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद वा प्रतिक्रिया देतील, असा अट्टाहास शेवटी तुम्ही करू शकत नाही, असे तो म्हणाला.
टायगरच्या या उत्तरावरून एकच कळले, ते म्हणजे तो ‘ओव्हरप्रोटेक्टिव्ह’ असला तरी कृष्णाच्या भावनांचा आदर करणारा भाऊ सुद्धा आहे.

Web Title: OMG !! Tiger Shroff wants to cover sister Krishna?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.