OMG : ​स्वत:चे घर सोडून शाहिद कपूर का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 10:14 AM2017-06-24T10:14:26+5:302017-06-24T15:44:26+5:30

शाहिद कपूरने आपले घर सोडले असून तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे ...

OMG: Shahid Kapoor leaving his own house in the rented hotel! | OMG : ​स्वत:चे घर सोडून शाहिद कपूर का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये !

OMG : ​स्वत:चे घर सोडून शाहिद कपूर का राहतोय भाड्याच्या हॉटेलमध्ये !

googlenewsNext
हिद कपूरने आपले घर सोडले असून तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वत:चे घर असूनही दुसऱ्याच्या घरात शिप्ट होतात. मात्र शाहिद घराऐवजी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. बहुतेकजण घरात भांडण झाल्याने किंवा इतर कारणाने घर सोडतात, मात्र शाहिदच्या घर सोडण्याचे कारण म्हणजे शूटिंगला जाताना आणि येताना होणारा ट्रॅफिकचा त्रास होय. 
पद्मावती या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहदेखील आहेत. हे कलाकारदेखील फिल्म सिटीच्या जवळच राहू लागले आहेत. 

Related image

घरापासून शूटिंगच्या ठिकाणी पोहचण्यात शाहिदला आपला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. म्हणून शुटिंग संपेपर्यंत शाहिद याच हॉटेलमध्ये राहणार आहे. शाहिदला शूटिंग ठिकाणी पोहचायला आणि पुन्हा घरी वापस यायला सुमारे ४ तास वाया जायायचे. आता मात्र तो रोज सकाळी लवकर शुटिंग ठिकाणी पोहचतो आणि रात्री उशिरापर्यंत शूट करतो. या चित्रपटात शाहिद दोन लुकमध्ये दिसणार असून त्यासाठी त्याला वर्कआउटदेखील करावे लागते.   
चित्रपटाच्या रिलीजसाठी सुरुवातीलाच आलेल्या अडचणींमुळे प्रोजेक्टच्या शेड्यूलला अगोदरच उशिर झाला आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबरला चित्रपट गृहात येण्याची शक्यता आहे.  

Also Read : ​शाहिद कपूर म्हणतो, स्टार नाही, सुपरस्टार म्हणा!!
 

Web Title: OMG: Shahid Kapoor leaving his own house in the rented hotel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.