OMG ! शाहरूख खानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चाहत्यांना पडले महाग; चोरट्यांनी साधली आयती संधी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 11:07 IST2017-11-02T05:37:32+5:302017-11-02T11:07:32+5:30
आज २ नोव्हेंबरला शाहरूख खानचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी शाहरूख आपल्या कुटुंबासोबत अलिबागला रवाना झालाय. त्याच्यासोबत बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार ...

OMG ! शाहरूख खानच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चाहत्यांना पडले महाग; चोरट्यांनी साधली आयती संधी!!
आ २ नोव्हेंबरला शाहरूख खानचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी शाहरूख आपल्या कुटुंबासोबत अलिबागला रवाना झालाय. त्याच्यासोबत बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार एसआरकेच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी अलिबागला पोहोचले आहेत. पण या सगळ्या सेलिब्रेशनदरम्यान एक वाईट बातमीही आहे. होय, दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखचे शेकडोंच्या संख्येतील चाहते त्याच्या वाढदिवसाला ‘मन्नत’ बाहेर जमलेत. अनेकांनी शाहरूखला बर्थ डे विश करण्यासाठी ‘मन्नत’बाहेर रात्र जागून काढली. कुणी शाहरूखची मोठमोठी पोस्टर्स घेऊन पोहाचले. अनेक जण केक़,भेटवस्तू, ग्रीटींग्स असे काय काय घेऊन पोहोचले आणि ‘मन्नत’बाहेरचा सगळा परिसर एखादी जत्रा असावी तसा गजबजून गेला. पण काही मोबाईलचोरांनी याचा फायदा घेतला आणि अनेक चाहत्यांचे मोबाईल हातोहात चोरी गेलेत.
![]()
वांद्रयातील शाहरूखच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर कुणी केक कापण्यात मग्न होते तर कुणी शाहरूख...शाहरूख....असे जोरजोरात ओरडत आपल्या लाडक्या स्टारला शुभेच्छा देत होते. म्हणजेच एकीकडे शाहरूखचे चाहते त्याच्या प्रेमात बेभान झाले होते आणि दुसरीकडे मोबाईल चोर आयती संधी लाटत होते. त्यामुळे ‘मन्नत’बाहेर जमलेल्या गर्दीतील अनेकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेत. वांद्रे पोलिस ठाण्यात काल रात्री १० ते १२ मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या त्या त्यामुळेच. एकंदर काय तर शाहरूखचा वाढदिवस साजरा करणे अनेकांना महाग पडले. अर्थात यामुळे चाहत्यांचे शाहरूखवरील प्रेम जराही कमी होणारे नाही. उलट ते वाढतच जाणार. पुढल्या वर्षी ‘मन्नत’बाहेर यावर्षीपेक्षा अधिक गर्दी जमणार आणि चाहते असेच बेभान होणार, हे सांगणे नकोच.
ALSO READ: Birthday Special : त्या काळात कंडोम विकायलाही तयार होता शाहरूख खान; असा बनला ‘रोमान्सचा बादशाह’!
शाहरूख आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. यावर्षी शाहरूखचे ‘रईस’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ हे दोन सिनेमे रिलीज झालेत. अर्थात बॉक्स आॅफिसवर शाहरूखचे हे दोन्ही चित्रपट फार कमाल करू शकले नाहीत. त्याआधी आलेला शाहरूखचा ‘दिलवाले’ही असाच आपटला होता. त्यामुळे आता शाहरूखला एका हिटची गरज आहे. तूर्तास शाहरूख खान दिग्दर्शक आंनद एल राय यांच्या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण यात तो एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.