OMG !! तापसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 08:55 AM2017-06-30T08:55:13+5:302017-06-30T14:25:13+5:30

तापसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून! शीर्षक वाचून धक्का बसला ना! पण थांबा, तापसी ऋषी कपूर यांची सून बनणार ...

OMG !! Rishi Kapoor to become Tapi Pannu! | OMG !! तापसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून!

OMG !! तापसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून!

googlenewsNext
पसी पन्नू बनणार ऋषी कपूरची सून! शीर्षक वाचून धक्का बसला ना! पण थांबा, तापसी ऋषी कपूर यांची सून बनणार असली तरी रिअल लाईफ सून नाही तर रिल लाईफ सून. होय, दिग्दर्शक अभिनव देव यांच्या चित्रपटात तापसी ऋषी कपूर यांच्या सूनेची भूमिका साकारणार आहे. यात प्रतिक बब्बर ऋषी यांच्या मुलाची भूमिका साकारताना दिसेल आणि तापसी त्याच्या वहिणीच्या भूमिकेत. हा चित्रपट नक्षलवाद आणि दहशतवाद या मुद्याला स्पर्श करणारा आहे. आपल्या कुटुंबाच्या हक्कासाठी लढणारी सून तापसी यात साकारणार आहे.

सध्या तापसी ‘जुडवा2’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा चित्रपटत सलमान खानच्या ‘जुडवा’ या गाजलेल्या सिनेमाचा सीक्वल आहे. तापसीसोबत यात जॅकलिन फर्नांडिस आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत आहेत. ‘जुडवा2’च्या कास्टने लंडनमधील पहिले शेड्यूल संपवले आहे. सध्या मुंबईत या चित्रपटाचे शूटींग ुसरु आहे. गतवर्षी ‘पिंक’ या चित्रपटाने तापसीला एक वेगळीच ओळख दिली. यानंतर तिचा ‘नाम शबाना’ हा चित्रपट आला. या दोन्ही चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. आता सूनेची भूमिका तापसी कशी साकारते, हीच उत्सुकता आहे. अभिनय देव यांच्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाबद्दलचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहूच.

ALSO READ : तापसी पन्नू : कपडे काढून कॅमे-यापुढे उभे राहणे केवळ इतकीच ‘बोल्ड’ची व्याख्या नाही

तूर्तास ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलायचे तर, सध्या ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात व्यस्त आहेत. यात चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल २६ वर्षांनंतर अमिताभ व ऋषी कपूर यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

Web Title: OMG !! Rishi Kapoor to become Tapi Pannu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.