OMG : नाना पाटेकरला अजूनही येते ‘या’ अभिनेत्रीची आठवण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 14:37 IST2017-07-04T08:57:36+5:302017-07-04T14:37:29+5:30

बॉलिवूड म्हणजे एक ग्लॅमरस जग. त्यात प्रेम, रोमान्स, अफेर्स आलेच. अनेक असे स्टार्स आहेत जे नेहमी आपल्या प्रेमामुळे किंवा ...

OMG: Nana Patekar still remembers this actress! | OMG : नाना पाटेकरला अजूनही येते ‘या’ अभिनेत्रीची आठवण !

OMG : नाना पाटेकरला अजूनही येते ‘या’ अभिनेत्रीची आठवण !

लिवूड म्हणजे एक ग्लॅमरस जग. त्यात प्रेम, रोमान्स, अफेर्स आलेच. अनेक असे स्टार्स आहेत जे नेहमी आपल्या प्रेमामुळे किंवा अफे रमुळे चर्चेत असतात. नुकतीच एक चर्चा अशी आहे की, नाना पाटेकरला सध्या एका को-अ‍ॅक्ट्रेसची प्रचंड आठवण येत आहे आणि नानाने ते स्वत: मान्यही केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला होय. 

Image result for nana-patekar-manisha-koirala

मनीषा कोईरालादेखील तिच्या रोमॅण्टीक भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत राहिली होती. पण तिच्या प्रेमसंबंधांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली असेल तर ती नाना पाटेकर यांचीच. २० वर्षांनी मोठ्या, विवाहित माणसाच्या प्रेमात मनिषा होती. इतर कलाकारांप्रमाणे नाना आणि मनिषा यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवले नाही. उलट ते नेहमीच याबद्दल बोलायचे. माझे माझ्या पुरुषांवर प्रेम आहे असे एकेकाळी मनीषाने ठामपणे सांगितले होते. 

९० च्या दशकात हे प्रेमप्रकरण खुलू लागलं.  नाना पाटेकरांच्या अभिनयाबद्दल कोणीच प्रश्न विचारु शकत नव्हते. पण असे असले तरी त्यांच्याकडे हिरोला साजेसे लूक कधीच नव्हते.. शिवाय एक रागीट माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तर दुसरीकडे तर मनिषाचे विवेक मुशरन याच्याशी नुकताच प्रेमभंग झाला होता. नाना आणि मनिषा अग्निसाक्षी सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. लवकरच नाना पाटेकरांची मोहिनी तिच्यावर झाली आणि ती स्वत:ला त्यांच्या प्रेमात पडण्यापासून अडवू शकली नाही.

सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यान ते एकमेकांना डेटही करु लागले. पण त्यांचे हे प्रेम प्रसारमाध्यमांपासून काही लपून राहिले नाही. मनिषाचे शेजारी आणि सेटवरची काही माणसे नाना पाटेकर मनिषाला कधी भेटतात याची माहिती आनंदाने देतच होते. अनेकदा नाना पाटेकर यांना मनिषाच्या घरुन पहाटे निघतानाही पाहिले होते. 

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी सिनेमात लवकरच ते एकत्र आले. पण यावेळी प्रसारमाध्यमांकडून दोघांनाही पडद्यामागील त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दलच अधिक विचारले जात होते. मनिषाने नंतर ही गोष्ट मान्यही केली की ती आणि नाना एकमेकांसोबत आहे. नंतर नाना यांनीही या गोष्टीचा स्विकार केला. आणि आजही नाना हे प्रेम विसरू शकलेले नाही. त्यांनी मला मनिषाची आठवण येते असं उघडपणे सांगितलं आहे. 
Source : india.com

Web Title: OMG: Nana Patekar still remembers this actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.