OMG: आयर्न मॅन मिलिंद सोमणचा बीचवर न्यूड रन, फोटोने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:30 PM2020-11-04T12:30:58+5:302020-11-04T12:31:36+5:30

वयाच्या ५५ वर्षीही मिलिंद फिट आहे. पहिल्यादाच त्याने असा फोटो शेअर केला आहे असे नसून यापूर्वीही त्याने अनेकदा असे फोटो शेअर केले होते.

OMG: Milind Soman runs naked on the beach on his 55th birthday | OMG: आयर्न मॅन मिलिंद सोमणचा बीचवर न्यूड रन, फोटोने वेधले लक्ष

OMG: आयर्न मॅन मिलिंद सोमणचा बीचवर न्यूड रन, फोटोने वेधले लक्ष

googlenewsNext

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे विविध अंदाजातील फोटो  पाहायला मिळतात. आयर्न मॅन मिलिंद सोमणचा आज ५५ वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटो तो बीचवर न्यूड रन करताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच या फोटोने चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधले आहे. हा फोटो पाहून संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहे. तर त्याचे कौतुकही करताना पाहायला मिळत आहे. वयाच्या ५५ वर्षीही मिलिंद फिट आहे.

पहिल्यादाच त्याने असा फोटो शेअर केला आहे असे नसून यापूर्वीही त्याने अनेकदा असे फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर तो नेहमी फिटनेस संदर्भातील त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचा फिटनेस पाहून त्याच्या चाहत्यांनाही तो प्रेरणा देत असतो. तो नित्यनियमाने फिटनेसवर लक्ष देतो. जराही दुर्लक्ष होवू देत नाही. 


इन्स्टाग्रामवर मिलिंद सोमणने गुरूवारी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनला त्याने लिहिले की, '१९८९ मध्ये मला पहिल्या जाहिरातीसाठी काही तासात काही फोटो शूट करण्यासाठी तब्बल ५०००० रूपये ऑफर झाले होते. ही रक्कम ऐकून मी हैराण झालो होतो.

मला वाटलं होतं हे लोक पूर्णपणे पागल आहेत. मी त्यावेळी २३ वर्षांचा होतो आणि एका हॉटेलमध्ये काम करत होतो. विचार करत होतो की, मला वेटर किंवा कुक म्हणून करिअरची सुरवात करायला पाहिजे. जग एक अद्भूत जागा आहे'.


काही दिवसांपूर्वीच मिलिंद सोमणने सोशल मीडियात एक फोटो शेअर केला होता. ज्यात तो छाती झाडांच्या पानाने लपवताना दिसला होता. या फोटोवरून मिलिंद चांगलाच ट्रोल झाला होता. त्याची तुलना लोकांना कियारा अडवाणीसोबत केली होती. कारण डबू रत्नानीच्या फोटोशूटमध्ये कियाराने असाच फोटो काढला होता. 

 मिलिंद आणि अंकितासह रेशीमगाठीत अडकल्यानंतर जास्त चर्चेत आला.दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक आहे.  या अजब वाटणा-या कपलची सोशल मीडियावर नेहमीच गजब फोटो पाहायला मिळतात.

लग्नानंतर दोघांमध्ये आणखीन घट्ट नाते निर्माण झाले आहे. दोघेही एकमेकांची तितकीच काळजी घेतात. विशेष म्हणजे मिलिंदप्रमाणे अंकिताही फिटनेस फ्रिक आहे. 

Web Title: OMG: Milind Soman runs naked on the beach on his 55th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.