OMG ! ​कॅटरिना कैफने ऐश्वर्या राय बच्चनला म्हटले ‘लोमडी’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 11:40 IST2017-06-18T06:08:17+5:302017-06-18T11:40:00+5:30

रणबीरने ‘लोमडी’ म्हटले आणि कॅटने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. आता कॅटरिनाने ऐश्वर्याला ‘लोमडी’ का म्हटले, हे मात्र कळले नाही. खरे तर कॅटला ऐश्वर्याशी अशाप्रकारे शत्रूत्व ओढवून घ्यायला नको होते.

OMG! Katrina Kaif tells Aishwarya Rai Bachchan | OMG ! ​कॅटरिना कैफने ऐश्वर्या राय बच्चनला म्हटले ‘लोमडी’!!

OMG ! ​कॅटरिना कैफने ऐश्वर्या राय बच्चनला म्हटले ‘लोमडी’!!

टरिना कैफ व रणबीर कपूर या दोघांचे लव्ह रिलेशन संपुष्टात आलेय. अर्थात प्रोफेशनल लाईफआड हे संपलेले नाते कुठेही येणार नाही, याची काळजी रणबीर व कॅटरिना सध्या घेत आहेत. होय, दोघांचाही ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा येतो आहे. या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कॅट व रणबीरने कुठलीही कसर सोडलेली नाही. अलीकडे ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी कॅट व रणबीर दोघेही फेसबुकवर लाईव्ह होते. या दरम्यान दोघांनीही धम्माल मस्ती केली. शिवाय काही गेम्मही खेळलेत. पण एक गेम खेळता खेळता कॅटरिनाने चक्क ऐश्वर्या राय बच्चनला डिवचले. त्याचे झाले असे की, रणबीर व कॅट एक गेम खेळत होते. यात रणबीरने काही प्राण्यांची नावे घेतली आणि त्यासोबत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची नावे जोडायला सांगितली. रणबीरने ‘लोमडी’ म्हटले आणि कॅटने ऐश्वर्या रायचे नाव घेतले. आता कॅटरिनाने ऐश्वर्याला ‘लोमडी’ का म्हटले, हे मात्र कळले नाही. खरे तर कॅटला ऐश्वर्याशी अशाप्रकारे शत्रूत्व ओढवून घ्यायला नको होते.



ALSO READ :  सौंदर्यात कॅटरिना कैफलाही धोबीपछाड देईल तिची धाकटी बहीण इसाबेल!

यानंतर एका चाहत्याने रणबीरला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या पाच व्यक्तींची नावे विचारली. यावर रणबीरने  मॉम, डॅड, भाची, अयान अशांची नावे घेतली. अन्य दोन सर्वाधिक जवळच्या व्यक्तिंमध्ये रणबीरने आपल्या कुत्र्यांची नावे घेतली. तुला खूश ठेऊ शकलो असतो तर मी तुझेही नाव घेऊ शकलो असतो. म्हणून मी माझ्या दोन कुत्र्यांची नावे घेईल,असे यावेळी रणबीर कॅटरिनाला उद्देशून म्हणाला.
एकंदर काय तर, बे्रकअप विसरून रणबीर व कॅटरिना ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. येत्या जुलैमध्ये हा चित्रपट रिलीज होतो आहे.

Web Title: OMG! Katrina Kaif tells Aishwarya Rai Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.