OMG : करिना कपूर-खान होणार पुन्हा आई!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 21:41 IST2018-05-31T16:06:34+5:302018-05-31T21:41:31+5:30

तैमूरच्या जन्माअगोदरच करिना कपूर-खान मोजकेच चित्रपट साइन करीत होती. प्रेग्नेंसीपासून ते तैमूर एक वर्षांचा होईपर्यंत करिना चित्रपटांपासून दूर राहिली. ...

OMG: Kareena Kapoor-Khan will be seen again! | OMG : करिना कपूर-खान होणार पुन्हा आई!!

OMG : करिना कपूर-खान होणार पुन्हा आई!!

मूरच्या जन्माअगोदरच करिना कपूर-खान मोजकेच चित्रपट साइन करीत होती. प्रेग्नेंसीपासून ते तैमूर एक वर्षांचा होईपर्यंत करिना चित्रपटांपासून दूर राहिली. आता ती ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र आता एक बातमी समोर आली असून, वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, करिना पुन्हा एकदा आई बनणार आहे. मात्र ती चित्रपटात आईची भूमिका साकारणार आहे. 

‘वीरे दी वेडिंग’नंतर करिनाला आणखी एक चित्रपट मिळाला असून, त्यात ती आईची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या बॅनरअंतर्गत केली जाणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना करिना एका आईच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तिने हा चित्रपट साइन केला असून, लवकरच त्याच्या शूटिंगला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. वास्तविक करण जोहरचीच इच्छा होती की, करिनाने त्याच्या बॅनरअंतर्गत बनविल्या जाणाºया चित्रपटांमध्ये पुन्हा काम करावे. त्याने करिनाला तैमूरच्या जन्मानंतर प्रस्तावही पाठविला होता. परंतु करिना त्यावेळी तैमूरच्या पालनपोषणात व्यस्त असल्याने तिने त्यास नकार दिला होता. 



दरम्यान, करणच्या या चित्रपटात लग्न आणि रिलेशनशिपबद्दलच्या बारिक-सारिक गोष्टी दाखविल्या जाणार आहेत. हा एक रोमॅण्टिक चित्रपट असणार आहे. मात्र या चित्रपटातून एक चांगला संदेशही दिला जाणार आहे. या चित्रपटातील इतर तीन मुख्य भूमिका साकारणाºया कलाकारांबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी ही बातमी आली होती की, सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात करिनाचा जोडीदार असणार आहे, तर कार्तिक आर्यनसह जान्हवी कपूरलाही चित्रपटात कास्ट केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

या चित्रपटाची शूटिंग याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होईल, असेही समजते. या चित्रपटाला ‘धडक’चे दिग्दर्शक शशांक खेतानच दिग्दर्शित करणार आहे, तर सहायक दिग्दर्शक म्हणून राज मेहता असणार आहे. 

Web Title: OMG: Kareena Kapoor-Khan will be seen again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.