OMG : डिप्रेशनमध्ये आहे मस्तानी दीपिका पादुकोण; पण का? कारण वाचाल तर धक्का बसेल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:55 IST2017-10-05T13:23:42+5:302017-10-05T18:55:34+5:30

बॉलिवूडची मस्तानी आणि यशस्वी अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोण हिने जाहीरपणे मान्य केले की, तिलादेखील डिप्रेशनचा सामना करावा लागला. डिप्रेशनमधून ...

OMG: Depression is in Mastani Deepika Padukone; But why? If the reads will be shocked! | OMG : डिप्रेशनमध्ये आहे मस्तानी दीपिका पादुकोण; पण का? कारण वाचाल तर धक्का बसेल !

OMG : डिप्रेशनमध्ये आहे मस्तानी दीपिका पादुकोण; पण का? कारण वाचाल तर धक्का बसेल !

लिवूडची मस्तानी आणि यशस्वी अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोण हिने जाहीरपणे मान्य केले की, तिलादेखील डिप्रेशनचा सामना करावा लागला. डिप्रेशनमधून स्वत:ला सावरण्यासाठी तिने लिव लव लाइफ फाउंडेशनचीही सुरुवात केली. ३१ वर्षीय दीपिकाने नुकतेच डिप्रेशनविषयीचे अनुभव कथन केले. भारत आर्थिक संमेलनात मानसिक रुग्णांशी संबंधित विषयावर बोलताना दीपिकाने म्हटले की, गेल्या काळात मी डिप्रेशनचा सामना केला. डिप्रेशनशी लढतानाचा अनुभव माझ्यासाठी खूपच कटू होता. मी आजही त्यातून म्हणावी तशी सावरली नाही. कारण मला आजही भीती वाटते की, मी पुन्हा त्याच्या घेºयात येऊ नये. 

दीपिकाने सांगितल्यानुसार, ‘मला नाही वाटत की मी, अजूनही पूर्र्णपणे डिप्रेशनमधून सावरली आहे. माझ्या मनात ही भीती कायम असते की, मी पुन्हा डिप्रेशनच्या विळख्यात जाऊ नये. हा अनुभव माझ्यासाठी खूपच कटू होता.’ यावेळी दीपिकाला विचारण्यात आले की, ‘तू तुझ्या डिप्रेशनविषयी एवढ्या बिंधास्तपणे बोलत असल्याने तुला त्याच्या परिणामाचा सामना करावा लागला काय?’ यावर दीपिकाने म्हटले की, ‘याबद्दल मी खात्रीशिरपणे सांगू शकत नाही, पण होऊ शकते की, यामुळे काही निर्माते माझ्याकडे येणार नाहीत.’ 



दीपिकाने देशभरातील शालेय पाठ्यक्रमात मानसिक स्वास्थ्य हा विषय सहभागी करून घेतल्याविषयी आपले मत मांडताना म्हटले की, ‘याविषयी ज्या काही भ्रामक धारणा आहेत, त्या सोडविण्यास मदत होईल. दीपिका पादुकोण सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात दीपिका राणी पद्मावतीची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दीपिकाचा चित्रपटातील फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता. चित्रपटात दीपिका व्यतिरिक्त शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: OMG: Depression is in Mastani Deepika Padukone; But why? If the reads will be shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.