OMG!! ​अनुष्का शर्माने रिसेप्शनमध्येही केली दीपिका पादुकोणची ‘कॉपी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 11:14 IST2017-12-22T05:44:40+5:302017-12-22T11:14:40+5:30

काल नवी दिल्लीत अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचा थाट विरूष्काच्या लग्नाच्या ...

OMG !! Deepika Padukone's 'Copy' in Anushka Sharma's Reception! | OMG!! ​अनुष्का शर्माने रिसेप्शनमध्येही केली दीपिका पादुकोणची ‘कॉपी’!

OMG!! ​अनुष्का शर्माने रिसेप्शनमध्येही केली दीपिका पादुकोणची ‘कॉपी’!

ल नवी दिल्लीत अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनचा थाट विरूष्काच्या लग्नाच्या थाटापेक्षाही मोठा होता. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे विरूष्काचा रिसेप्शन सोहळा झाला. साहजिकच विराट व अनुष्का हे दोघेही या सोहळ्याचे आकर्षण होते. पण यावेळी सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या एकट्या अनुष्कावर. याला कारणही तसेच होते. लालचुटूक बनारसी साडी, भांगात लाल कुंकू, कपाळावर मोठी टिकली, केसांत माळलेला गजरा आणि गळ्यात साजेशी ज्वेलरी हा अनुष्काचा थाट बघण्यासारखा होता. पण हे काय? अनुष्काचे रिसेप्शनमधील हे लूकही दीपिका पादुकोणची ‘कॉपी’ होती, असे आम्ही सांगितले तर? होय, अनुष्काने रिसेप्शनमध्ये नेसलेली साडी फॅशन डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केलेली होती. अगदी याच साडीशी मिळती-जुळती साडी दीपिकाने अलीकडे एका इव्हेंटमध्ये नेसली होती.



हेमा मालिनी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दीपिका अशाच लाल रंगाच्या बनारसी साडीत पोहोचली होती. त्यामुळे नेमकी दीपिकाच्या याच साडीशी मॅच होणारी साडी अनुष्काने आपल्या रिसेप्शनसाठी निवडावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



ALSO READ : अनुष्का शर्माने केली दीपिकाची कॉपी,लग्नात घातले सेम टु सेम झुमके!

यापूर्वी लग्नातही अनुष्काने दीपिकाच्या झुमक्यांची कॉपी केली होती. दीपिकाने आॅक्टोबरमध्ये एका अवार्ड फंक्शनमध्ये कानात जे झुमके घातले होते अगदी तसेच सेम टू सेम झुमके अनुष्काने लग्नात कॅरी केले होते. अनुष्काचा लग्नातील लेहंग्यासोबत कॅरी केलेला दुपट्टाही पद्मावती स्टाईलनेच कॅरी केला होता.  अनुष्कावर  ‘दीपिका  फिव्हर’ चढल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. कदाचित अनुष्कावरचा हा ‘दीपिका  फिव्हर’ अजूनही उतरलेला नाही, असेच म्हणावे लागले. 
दिल्लीतील रिसेप्शननंतर येत्या २६ डिसेंबरला मुंबईत विराट व अनुष्काचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. अलीकडे विरूष्काच्या मुंबईतील या रिसेशप्शनची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. विराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु होते. एका कमर्शिअलच्या शूटवेळी दोघांचीही भेट झाली होते. अर्थात २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या होत्या.

Web Title: OMG !! Deepika Padukone's 'Copy' in Anushka Sharma's Reception!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.