OMG ! ​‘टायगर जिंदा है’चा कॉन्सेप्ट व कथा लीक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:26 IST2016-12-04T17:26:39+5:302016-12-04T17:26:39+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान सध्या ‘ट्यूबलाईट’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ट्युबलाईटनंतर सलमान त्याच्याच ‘एक था टायगर’चा सीक्वल ‘टायगर जिंदा है’मध्ये ...

OMG! Concept and story leak of 'Tiger is alive' !! | OMG ! ​‘टायगर जिंदा है’चा कॉन्सेप्ट व कथा लीक!!

OMG ! ​‘टायगर जिंदा है’चा कॉन्सेप्ट व कथा लीक!!

लिवूडचा ‘दबंग’ सलमान खान सध्या ‘ट्यूबलाईट’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ट्युबलाईटनंतर सलमान त्याच्याच ‘एक था टायगर’चा सीक्वल ‘टायगर जिंदा है’मध्ये दिसणार आहे.‘टायगर जिंदा है’बद्दल सलमान व या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड गोपनियता बाळगून आहे. पण इतक्या प्रयत्नानंतरही ‘टायगर जिंदा है’चा कॉन्सेप्ट आणि कथेचे काही डिटेल्स लीक झाले आहेत.
 सलमानचा ‘एक था टायगर’ कबीर खानने दिग्दर्शित केला होता. मात्र ‘टायगर जिंदा है’ कबीर नाही तर दिग्दर्शक अली अब्बास जफर दिग्दर्शित करणार आहे. अलीकडे रिलीज झालेला ‘सुल्तान’ही अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता. सूत्रांच्या मते, ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमानची भूमिका हॉलिवूड चित्रपट ‘बॉर्न ’सीरिजमधील भूमिकेशी मिळतीजुळती असेल. अर्थात ‘टायगर जिंदा है’ मॅट डेमॅनच्या ‘जेसन बॉर्न’चा रिमेक वा कॉपी नसेल किंवा यात सलमानची जेसन बॉर्नप्रमाणे स्मृतीही जाणार नाही. पण सलमान यात या गाजलेल्या हॉलिवूड पात्रासारखा दिसेल. ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान रॉच्या अधिका-यांना गुंगारा देताना दिसेल.
 


‘एक था टायगर’मध्ये सलमान रॉ एजंट होता. मात्र ‘टायगर जिंदा है’मध्ये रॉ एजंट सलमानचा पिच्छा पुरवताना दिसतील. सलमानची गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ यात दिसेल. पण एका निगेटीव्ह भूमिकेत. सूत्रांच्या मते, रॉ अधिका-यांना चकमा देत सलमान देश-विदेशात फिरताना दिसेल. यात कॅटरिनासोबत एक विदेशी हिरोईनसोबत दिसेल. खरे तर अली अब्बास जफर यांना सलमानसोबत कॅटरिनाच हवी होती. पण यशराज बॅनरला ही जोडी पसंत आलेली नसावी. कदाचित त्यामुळेच या चित्रपटासाठी त्यांनी एका विदेशी हिरोईनला साईन केले.


 

Web Title: OMG! Concept and story leak of 'Tiger is alive' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.