OMG ! अजय देवगणने सोशल मीडियावर लीक केला काजोलचा व्हॉट्सअॅप नंबर, झाला ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:07 IST2018-09-24T19:04:26+5:302018-09-24T19:07:17+5:30
अजय देवगणने ट्विटरवर काजोलचा नंबर शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो ट्रोल झाला आहे.

OMG ! अजय देवगणने सोशल मीडियावर लीक केला काजोलचा व्हॉट्सअॅप नंबर, झाला ट्रोल
सोशल मीडियावर नेहमी सेलिब्रेटीजचे फोटो लीक होतात किंवा बऱ्याचदा काही सेलिब्रेटीजचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होते. तर कधी त्यांची खासगी गोष्ट सोशल मीडियवर लीक होते. असेच काहीसे अभिनेत्री काजोलसोबत झाले आहे. तिचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर ट्विटरवर लीक झाला आहे. हा नंबर दुसरा व्यक्तीने नाही तर चक्क तिचा नवरा व अभिनेता अजय देवगणने ट्विटरवर शेअर केला आहे.
अजय देवगणने ट्विटरवर काजोलचा नंबर शेअर करून लिहिले की, काजोल यावेळी भारतात नाही आहे. कृपया तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर तिला कॉर्डिनेट करा. हे ट्विट पाहून अजय देवगणचे चाहते हैराण झाले होते. त्यानंतर अजय देवगणला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अजय देवगणने असे का केले हे अद्याप समजू शकलेले नाही व काजोलकडून देखील याचे कारण समजू शकलेले नाही.
कमेंट बॉक्समध्ये ट्रोलर्सने अजय देवगणला गुटखा कमी खाण्यापासून बरेच सल्ले दिले. एका व्यक्तीने लिहिले की मेंदू केसरी झाले वाटते. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की त्याने २५० रुपये काजोलच्या सिनेमावर खर्च केले होते. त्याचा आता तो बदला घेईल. तर एका युजरने काजोलचा नंबर सेव्ह करून तिला व्हॉट्सअॅप मेसेजदेखील पाठवला व त्याचा स्क्रीनशॉट अजय देवगणला ट्विटच्या कमेंटमध्ये शेअर केला. अशापद्धतीने अजय देवगण सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. मात्र अजय देवगणचे चाहते यामागचे कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.