​ओम पुरी यांना त्यांची दुसरी पत्नी त्रास देत होती; अन्नू कपूरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:53 IST2017-01-12T18:50:49+5:302017-01-12T18:53:36+5:30

दिवंगत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनाबद्दल अनेक खुलासे होत आहेत. ओम पुरी यांचे खास मित्र ...

Om Puri was troubled by his second wife; Annu Kapoor reveals | ​ओम पुरी यांना त्यांची दुसरी पत्नी त्रास देत होती; अन्नू कपूरचा खुलासा

​ओम पुरी यांना त्यांची दुसरी पत्नी त्रास देत होती; अन्नू कपूरचा खुलासा

वंगत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्या निधनानंतर त्यांच्या जीवनाबद्दल अनेक खुलासे होत आहेत. ओम पुरी यांचे खास मित्र अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी ओम पुरी यांची मानसिक अवस्था खालावली होती असे विधान केले होते. आता पुन्हा अभिनेता अन्नू कपूर यांनी ओम पुरी यांची दुसरी पत्नी त्यांना त्रास देत होती असे धक्कादायक विधान केले आहे. अन्नू कपूर ओम पुरीच्या पहिल्या पत्नीचा भाऊ आहे हे विशेष. 

अभिनेता अन्नू कपूर म्हणाले, ओम पुरी यांच्या अंतिम दिवसांत त्यांची दुसरी पत्नी व मुलगा त्यांना त्रास देत होते, त्यांचा अपमान करीत होते.  याचमुळे त्यांची आपल्या पहिल्या पत्नीशी जवळीक वाढली होती. ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा ही अन्नू कपूरची बहीण आहे. अन्नू कपूर म्हणाले, माझ्या बहिणीशी ओम पुरी यांचे लग्न झाले होते मात्र वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. ओम पुरी साहेब त्रस्त होते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाकडून, पत्नी व मुलांकडून प्रेम मिळत नसेल तर त्या व्यक्तीला दु:ख होते. अशा वेळी तो तेथे जातो, ज्याला त्याने कधी काळी मागे सोडलेले होते, हेच कारण आहे की ओम पुरी पुन्हा एकदा सीमाच्या संपर्कात आले होते. 

om puri and nandita

अभिनेते ओम पुरी पत्नी नंदिता व मुलगा इशांतसोबत 
अन्नू कपूर म्हणाले, ओम पुरी यांनी जेव्हा माझी बहीण सीमाला घटस्फोट दिला होता, तेव्हा तिला फार दु:ख झाले होते. तिने खूप सहन केले. ही वेळ सीमा व नंदिता यांच्याबद्दल सांगण्याची नाही. मात्र जर कुणी एखाद्याचे घर मोडत असेल तर तुम्ही आनंदी कसे राहू शकता. 

अन्नू कपूर यांनी सांगितले, आम्ही मुंबई पोलिसांच्या संपर्कात असून, माझी बहीण पोलिसांना सहकार्य करणार आहे. हे प्रकरण एक हायप्रोफाईल मॅटर आहे यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलिस योग्य प्रकारे करतील. ओमपुरी यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की आणखी काही याचा शोध घेतील. 

om puru and sima kapoor

ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूर 
६ जानेवारीच्या सकाळी ओम पुरी यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पोस्टमार्टमनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यावर व हातावर जखमा असल्याने या प्रकरणाची पोलीस चौकशी करीत आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांची तपासणी करण्यात आली आहे. 

Web Title: Om Puri was troubled by his second wife; Annu Kapoor reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.