officially divorced: सौंदर्या रजनीकांत व आर. अश्विन यांचा अखेर घटस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 11:06 IST2017-07-05T05:36:59+5:302017-07-05T11:06:59+5:30
तामिळ सुपरस्टार रजनीकांतची लहान मुलगी सौंदर्या व अश्विन रामकुमार या दोघांचे लग्न अखेर कायदेशीररित्या संपुष्टात आले. दोघांनीही चेन्नईच्या कौटुंबिक ...

officially divorced: सौंदर्या रजनीकांत व आर. अश्विन यांचा अखेर घटस्फोट!
त मिळ सुपरस्टार रजनीकांतची लहान मुलगी सौंदर्या व अश्विन रामकुमार या दोघांचे लग्न अखेर कायदेशीररित्या संपुष्टात आले. दोघांनीही चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी कौटुंबिक न्यायालयाने दोघांच्याही घटस्फोटाला मंजुरी दिली. गेल्या सात महिन्यांपासून सौंदर्या व अश्विन वेगळे राहत आहे. आपसी सहमतीच्या आधारावर न्यायालयाने घटस्फोट मान्य केला.दोघांचाही वेद नावाचा दोन वर्षांचा एक मुलगा आहे. वेदची कस्टडी कुणाकडे गेली? याबाबत काय निर्णय झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
![]()
ALSO READ : सौंदर्याने खास व्यक्तिसोबत साजरा केला वाढदिवस!
३ सप्टेंबर २०१० रोजी सौंदर्या व अश्विन दोघेंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नापूर्वी चार वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. गतवर्षी सौंदर्या व अश्विन त्यांच्यातील वाद विकोपाला पोहोचले होते. रजनीकांत यांनी सौंदर्या व अश्विन यांच्यात मध्यस्थी करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. मात्र दोघेही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम होते. मी माझ्या पतीपासून विभक्त झालेय, असे यानंतर सौंदर्याने टिष्ट्वटरवरून जाहिर केले होते. गतवर्षी डिसेंबरमध्ये दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सौंदर्या व अश्विनच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदर्या आणि अश्विन यांचे संबंध गत वर्षभरात चांगलेच बिनसले होते. त्यांच्या नात्यामध्ये प्रेम राहिले नव्हते. एकमेकांशी ते बोलतदेखील नव्हते. दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा राहिलाच नव्हता. हेच कारण आहे की, दोघांनी आपापली वेगळी वाट शोधण्याचा निर्णय घेतला.
अश्विन हा उद्योगपती आहे. तर सौंदर्या ही दक्षिणेतील एक उत्कृष्ट निर्माती, दिग्दर्शिका आहे. ती सध्या ‘ व्हीआयपी २’ हा चित्रपट दिग्दर्शित करतेय. या चित्रपटात धनुष आणि अभिनेत्री काजोल मुख्य भूमिकेत आहेत.