अजय देवगणच्या मुलीचा बिकीनी फोटो पाहून, नेटीझन्सही झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:31 PM2020-04-21T12:31:37+5:302020-04-21T12:32:09+5:30

इन्स्टाग्रामवर न्यासाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील ग्लॅमरस अदा पाहून रसिक फिदा झाले आहेत.

Nysa Devgn looks smoking hot in a bikini, photo gone viral-SRJ | अजय देवगणच्या मुलीचा बिकीनी फोटो पाहून, नेटीझन्सही झाले क्रेझी

अजय देवगणच्या मुलीचा बिकीनी फोटो पाहून, नेटीझन्सही झाले क्रेझी

googlenewsNext

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे, आर्यन खान असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलं सध्या जोरदार चर्चेत आहेत. या स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात.  याच यादीत आता आणखी नव्या नावाची भर पडली आहे. हे नाव म्हणजे न्यासा देवगण. न्यासाची वेगळी ओळखची तशीही गरज नाही. 

अजय देवगण आणि काजोल यांची लेक म्हणून न्यासाला सारेच ओळखतात. नेहमीच न्यासा तिच्या दिसण्यावरून ट्रोल होत असते. सेलिब्रेटींची मुलं म्हणजे अगदी ग्लॅमरस, गोरे दिसण्यातही सुंदर अशी एक सर्वसामान्यांची कल्पना असते. मात्र जेव्हा न्यासाचे फोटो समोर आले तिचा तेव्हाचा लूक पाहून सारेच आश्चर्य चकित झाले. काजोल आणि अजयची मुलगी असूनही तिला नेहमीच तिची खिल्ली उडवली गेली. मात्र न्यासाने देखील हे अगदी पॉझिटीव्हली घेत तिच्या लूक्सवर प्रचंड मेहनत घेतली. 


इन्स्टाग्रामवर न्यासाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील ग्लॅमरस अदा पाहून रसिक फिदा झाले आहेत. रसिकांकडून  कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायलर झाले असून तिने तिचा मेकओव्हर केला.

म्हणून आज न्यासाचे नवीन फोटो पाहून सारेच आवाक होत आहेत. अचानक आलेला इतका मोठा बदल पाहून आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पूर्वीपेक्षा न्यासा अधिक सुंदर दिसू लागली आहे. तिचे बिकनी लूक फोटो पाहूनच नेटीझन्स देखील वाहवा करताना पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड एंट्रीसाठी न्यासा आता रेडी असल्याचेही तिला बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात न्यासानेदेखील इतरांप्रमाणे बॉलिवूड पदार्पण केले तर आश्चर्य वाटायला नको.  

Web Title: Nysa Devgn looks smoking hot in a bikini, photo gone viral-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.