नूतन यांच्या सोज्वळ चेहºयामागील वेदना...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 12:14 PM2017-02-21T12:14:22+5:302017-02-21T17:44:22+5:30

सोज्वळ चेहºयाची अभिनेत्री म्हणून नूतन यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत साधी राहणी आणि सुंदर दिसणं हे त्यांचे प्लस पॉर्इंट. त्यांच्या ...

Nutan's face faces pain ... | नूतन यांच्या सोज्वळ चेहºयामागील वेदना...

नूतन यांच्या सोज्वळ चेहºयामागील वेदना...

googlenewsNext
ज्वळ चेहºयाची अभिनेत्री म्हणून नूतन यांच्याकडे पाहिले जाते. अत्यंत साधी राहणी आणि सुंदर दिसणं हे त्यांचे प्लस पॉर्इंट. त्यांच्या आयुष्यात खूप कमी वादविवाद आले असले तरी एकदा त्यांनी संजीवकुमारना प्रेमप्रकरणातून शिकविलेला धडा मोठा गाजला होता. २१ फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी.  त्यांच्या आयुष्यात आलेल्या या घडामोडींविषयी...



नूतन यांचे शिक्षण स्वीत्झर्लंडला झाले. त्यांची आई शोभना समर्थ यांनी चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना उद्युक्त केले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हमारी बेटी या चित्रपटातून त्यांनी सुरूवात केली. त्यानंतर नगिना या चित्रपटात नासिर खान यांच्यासोबत काम केले. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रौढांसाठी असल्याने नूतन यांना हा चित्रपट पाहता आला नाही. जिया सरहद्दी, शीशम, लैला मजनू, हीर शबाब असे चित्रपट केले. बारिश , पेईंग गेस्ट, सोने की चिडिया, अनाडी, सुजाता या चित्रपटातही त्यांनी काम केले. 



चन्दन, कभी अंधेरा कभी उजाला, आखरी दाव, लाईटहाऊस यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. 
त्याकाळी स्विमींग कॉश्चूम घालून त्यांनी खळबळ उडवून दिली. सुजाता, छाबिली, छलिया, कन्हैया, सूरत और सीरत, बंदिनी, तेरे घरके सामने, दिल ही तो है, खानदान, मिलन, सरस्वती चंद्र यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. विशेष म्हणजे सुजाता, बंदिनी, मिलन, मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाला. त्यानंतरही कर्मा, मेरी जंग यासारखे चित्रपट केले. 



नूतन यांनी राज कपूर, देव आनंद, अशोक कुमार यांच्यासोबत काम केले. दिलीपकुमार सोबत मुगल-ए-आझम या चित्रपटात काम करण्याची के. आसिफ यांनी आॅफर दिली होती. मात्र त्यांनी नाकारली. धमेंद्र, भारत भूषण, शम्मी कपूर, शेखर, अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले. संजीवकुमार सोबत देवी, गौरी असे चित्रपट केले. 



एकदा संजीवकुमार आणि नूतन यांच्यात संबंध असल्याचे वृत्त आले होते. नूतन यांना वाटले की संजीवकुमार हेच मिडीयाला या बातम्या देत आहेत. बºयाच वृत्तपत्रांतून या दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याचे वृत्त आले होते. एका पार्टीमध्ये संजीवकुमार आल्यानंतर नूतन यांनी त्याच्या थोबाडीत लगावली. त्यावेळी हे प्रकरण खूपच गाजले.



पैशावरून नूतन आणि त्यांचीं आई शोभना समर्थ यांच्यात खूप वाद व्हायचे. नूतन यांचे सर्व आर्थिक व्यवहार शोभना समर्थ याच पाहायच्या. आपण इतके कष्ट करूनही आपल्याला काहीही मिळत नसल्याची भावना नूतन यांच्यात झाली होती. त्यामुळे आपल्या आईविरुद्ध न्यायालयात केस दाखल केली आणि ती जिंकली. यामुळे तनुजा यांचे आई आणि सावत्र बहीण तनुजा यांच्यात कायमचे शत्रुत्व आले. तनुजा यांचे पती रजनीश बहल यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले.

आणखी वाचा: पुण्यतिथी विशेष : नूतनने आईलाच खेचले होते कोर्टात!




अर्थात त्यांच्या आई शोभना समर्थ यांचे म्हणणे वेगळे होते. आमचे मतभेद होते, परंतु नूतन यांच्या शेवटच्या क्षणी आम्ही एकत्र आलो. नूतन यांना आपला मृत्यू जवळ आल्याचे कळताच त्यांनी आईला गीता भेट दिली. स्वत:चा मृत्यू झाल्यावर वाचण्यास त्यांनी सांगितले होते. आम्हा दोघींची टेलिपथी खूप जबरदस्त होती. ज्यावेळी मी तिच्याविषयी विचार करायची तेंव्हा डोअरबेल वाजायची आणि दारात नूतन असायची. नूतन खूप छान गाणं गायचं त्याशिवाय चांगली भजनेही लिहिली. तिने मला खूप छान मनुष्य बनविले. सुरूवातीला मी खूप चिडचीड करायची आणि रागीट होते. तिच्या मृत्यूनंतर मला सर्व काही गमावल्याची भावना झाली. त्यामुळे मी खूप सहिष्णू झाले, असे शोभना समर्थ म्हणाल्या.

Web Title: Nutan's face faces pain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.