Video : 'नवराई माझी लाडाची गं', आयरा खानसाठी मराठमोळ्या सासूबाईंचा खास डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:43 PM2024-01-15T16:43:01+5:302024-01-15T16:43:37+5:30

आमिरच्या लेकीला सासरी मिळतंय प्रेम, आयरा खानसाठी मराठमोळ्या सासूबाईंनी केला डान्स

nupur shikhare mother special dance for daughter in law ira khan navrai mazi ladachi g goes viral | Video : 'नवराई माझी लाडाची गं', आयरा खानसाठी मराठमोळ्या सासूबाईंचा खास डान्स

Video : 'नवराई माझी लाडाची गं', आयरा खानसाठी मराठमोळ्या सासूबाईंचा खास डान्स

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. मराठमोळ्या नुपूर शिखरेबरोबर कोर्ट मॅरेज केल्यानंतर आयराने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. मुंबईत आयरा-नुपूरचं ग्रँड वेडिंग रिसेप्शनही पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर आयराचं मराठमोळ्या सासरी दणक्यात स्वागतंही झालं. 

आयरा-नुपूरच्या लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता आयराच्या सासूबाईंचा व्हिडिओ समोर आला आहे. लाडक्या सुनेसाठी नुपूरच्या आईने खास डान्सही केला. 'नवराई माझी लाडाची गं' या गाण्यावर आयराच्या सासूबाई थिरकल्या. इन्स्टाग्रामवरुन नुपूरच्या आईने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सुनेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "आमच्या आयुष्यात तू आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

आयराची सासू प्रितम शिखरे यादेखील एक नृत्यांगणा आहेत. त्यांनी कथ्थक नृत्यप्रकारचं प्रशिक्षण घेतलं असून अनेकांना त्या नृत्याचे धडेही देतात. युट्यूब चॅनेलवरही त्या डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी सुश्मिता सेनलाही कथ्थकचं प्रशिक्षण दिलं होतं. आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर १० जानेवारीला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: nupur shikhare mother special dance for daughter in law ira khan navrai mazi ladachi g goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.