...आता सलमान खान करणार एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफच्या बहिणींनाही लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 21:27 IST2017-02-11T15:56:19+5:302017-02-11T21:27:28+5:30
बॉलिवूडमध्ये कित्येकांना लॉन्च करणारा अभिनेता सलमान खान आता त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हिच्या बहिणींनाही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...

...आता सलमान खान करणार एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफच्या बहिणींनाही लॉन्च!
ब लिवूडमध्ये कित्येकांना लॉन्च करणारा अभिनेता सलमान खान आता त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हिच्या बहिणींनाही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार कॅटरिनाच्या दोन्ही बहिणी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्यांना सर्व सपोर्ट सलमान करीत असल्याचे समजते. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी कॅटरिनानेच सलमानला तिच्या बहिणींना लॉन्च करण्याविषयी चर्चा केली होती.
![]()
बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाºया कॅटरिना कैफ हिच्या यशाचे बरेचसे श्रेय सलमानला जाते. कारण त्यानेच तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. शिवाय ज्या काळात तिच्याकडे फारशा आॅफर्स नव्हत्या त्यावेळी सलमानने त्याच्या बॅनर्सअंतर्गत बनविल्या गेलेल्या सिनेमांमध्ये तिला लीड रोल दिले. त्याचदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंधही बहरले होते. काही काळानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. कॅटरिनाचे रणबीर कपूर याच्याशी सूत जुळल्याने ती सलमानपासून दूर गेली. आता तिचे रणबीरशीही ब्रेकअप झाल्याने ती सलमानशी पुन्हा जवळीकता साधण्याचा प्रयत्न करीत आहे. याचदरम्यान तिने तिच्या बहिणींना लॉन्च करण्याचे सलमानला सांगितले आहे. सलमाननेदेखील एक्स गर्लफ्रेंडचे मन न तोडता तिला होकार दिला आहे.
![]()
कॅटरिनाच्या बहिणी इसाबेल आणि सोनिया गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड डेब्यू करण्याची चर्चा रंगली होती. एका लीडिंग वेबसाइटने केलेल्या दाव्यानुसार सलमानच त्यांना लॉन्च करणार आहे. सध्या सलमान त्यांच्यासाठी स्क्रिप्ट शोधत असल्याचेही या वेबसाइटने स्पष्ट केले आहे. यासाठी सलमानने एक योजना आखली असून, त्यानुसार कॅटरिना प्रोडक्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याची शक्यता आहे. बहिणींना लॉन्च करण्यासाठी ती प्रोड्यूसर बनण्याची शक्यता आहे. खरं तर यापूर्वीच कॅटरिनाने प्रोड्यूसर बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.