प्रियांका चोप्रसोबत नाही तर अभिषेक बच्चनची ऐश्वर्या राय बच्चन सोबत जमणार जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 12:34 IST2017-09-07T07:04:33+5:302017-09-07T12:34:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भंसाळी पद्मावतीनंतर साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. ...

Not with Priyanka Chopra but with Abhishek Bachchan's Aishwarya Rai Bachchan jumping together | प्रियांका चोप्रसोबत नाही तर अभिषेक बच्चनची ऐश्वर्या राय बच्चन सोबत जमणार जोडी

प्रियांका चोप्रसोबत नाही तर अभिषेक बच्चनची ऐश्वर्या राय बच्चन सोबत जमणार जोडी

ल्या काही दिवसांपासून संजय लीला भंसाळी पद्मावतीनंतर साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. यात प्रियांका अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार होती.ज्या चित्रपटाच्या हिरोच्या शोधासाठी प्रियांका मुंबईत आली होती. ज्यासाठी अभिषेक बच्चन, इरफान खान आणि शाहरुख खानच्या नावाची चर्चा होती. मात्र कोणाचे नाव फायनल करण्यात आले नव्हते. ज्यानंतर मात्र प्रियांकाच्या टेड्स मॅच न झाल्याने तिला हा चित्रपट सोडावा लागला होता. प्रियांकाने हा चित्रपट सोडल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट बदलण्यात आली आहे.  

एक वेब पोर्टलच्या रिपोर्टनुसार संजय लीला भंसाळींना प्रियांकाने नकार दिल्यानंतर ते या चित्रपटासाठी आपली आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचा विचार करित आहेत. म्हणजेच ऐश्वर्या चित्रपटात अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार. तर साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनला घेण्यात येणार आहे. याची शूटिंगसाठी पुढच्या वर्षीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.   

ALSO REDA : ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस अवतार!

जर ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी या चित्रपटासाठी फायनल करण्यात आली तर दोघांचा एकत्र हा 9वा चित्रपट असणार आहे. सगळ्यात आधी दोघं रमेश सिप्पी यांच्या 2003 मध्ये आलेल्या कुछ ना कहो याचित्रपटात एकत्र झळकले होते. 2010 मध्ये आलेल्या मणी रत्नम यांच्या रावन याचित्रपट दोघांनी एकत्र काम केले होते. संजय लीला भंसाळींसोबत ऐश्वर्याने आधी ही काम केले आहे. हम दिल दे चुके सनम, देवदास आणि गुजारिश याचित्रपटांमध्ये ती दिसली होती. सध्या ऐश्वर्या फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.    

Web Title: Not with Priyanka Chopra but with Abhishek Bachchan's Aishwarya Rai Bachchan jumping together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.