बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत तर नाही कंगना राणौत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 11:46 IST2017-09-14T06:16:57+5:302017-09-14T11:46:57+5:30

कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ गर्ल. अनेक नट-नट्या ज्या मुद्यावर बोलायचे टाळतात. कंगना त्याच मुद्यावर अगदी बेधडक बोलते. कुणाचीही ...

Is not it possible to quit Bollywood, not Kangana Ranaut? | बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत तर नाही कंगना राणौत?

बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत तर नाही कंगना राणौत?

गना राणौत म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ गर्ल. अनेक नट-नट्या ज्या मुद्यावर बोलायचे टाळतात. कंगना त्याच मुद्यावर अगदी बेधडक बोलते. कुणाचीही पर्वा न करता आपली बाजू मांडते. अलीकडे ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगना आली आणि अगदी अशीच बेधडक बोलली. आदित्य पांचोली, हृतिक रोशन, सुमन अध्ययन, करण जोहर अशा कुणालाच तिने सोडले नाही. अफेअरपासून, रिलेशनशिपपासून तर नेपाटिझमपर्यंत सगळ्यांच मुद्यांवर तिने आपली मते मांडली. कंगनाच्या मते, तुम्हाला भेडसावणा-या समस्यांवर तुम्ही बोलणार नसाल तर ते पूर्णपणे चूक आहे. किंबहुना परिणामांच्या भीतीने स्वत:ला दाबून ठेवणे प्रचंड किळसवाणा प्रकार आहे. त्यामुळेच कंगना अगदी बेधडक बोलते. आता तर यापुढे जात तिने एक धाडसी विधान केले आहे. होय, माझ्या आत्मसन्मानाला जराही धक्का लागणार असेल तर मी बॉलिवूड सोडायलाही तयार आहे, असे कंगनाने म्हटलेय.

ALSO READ : ​गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘हटके’ प्रश्नांना, कंगना राणौतचे ‘हटके’ उत्तर!!

एका मुलाखतीत कंगनाने हे धाडसी विधान केले. मी व्यावसायिक जगातले साधन नाही तर एक जिवंत माणूस आहे. माझे विचार व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. माझे विचार इंडस्ट्रीतील प्रस्थापितांना कदाचित दुखावणारे असतील. पण ते खरे आहेत आणि त्यामुळे माझ्या विचारांमुळे दुखावणाºयांची मला पर्वा नाही. मी वडिलांचे घर सोडून पळून आले तेव्हा मी इथपर्यंत पोहोचेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी अनपेक्षित यश मिळवले. अनेक पुरस्कार मिळवले. यश, ग्लॅमर, पैसा सगळे काही मिळवले. आता मला चिंता नाही. यापुढे मला थोडे कमी मिळाले तरी चिंता नाही. मी बॉलिवूडमध्ये थांबले तर हे त्यांच्यासाठी चांगले आहे आणि मी इंडस्ट्री सोडली तर हे माझ्यासाठी चांगले आहे, असे मी वारंवार म्हणते. कारण आत्मसन्मान माझ्यासाठी सगळ्यांत मोठा आहे. आधी मी खूप भीत भीत काम केले. अपमान सहन केला. पण आता मी यशस्वी आहे आणि यशस्वी असताना बोलणार नाही तर कधी बोलेल. कदाचित मी यासाठीच लोकांच्या लक्षात राहील. उद्या  काम मिळाले नाही तर अधिकाधिक काय होणार? मनालीत चांगले घर बनवले आहे. तिथे जावून राहली. अ‍ॅक्टिंगशिवाय अनेक गोष्टी करेल. मी लेखक बनू शकते, डायरेक्टर बनू शकते. त्यामुळे मला चिंता नाही. काही दृष्ट लोकांसमोर झुकण्याऐवजी हे आयुष्य मला आवडेल, असे ती म्हणाली.

 

Web Title: Is not it possible to quit Bollywood, not Kangana Ranaut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.