'हिप हॉप इंडिया'मध्ये नोरा फतेही दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 07:21 PM2023-07-10T19:21:41+5:302023-07-10T19:22:03+5:30

Nora Fatehi : नोरा ही या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार असून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हा सहपरीक्षक असणार आहे. हे दोघे मिळून भारतातील सर्वोत्कृष्ट हिप हॉप डान्सर निवडणार आहेत.

Nora Fatehi will also be seen in the role of a judge in 'Hip Hop India' | 'हिप हॉप इंडिया'मध्ये नोरा फतेही दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

'हिप हॉप इंडिया'मध्ये नोरा फतेही दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

googlenewsNext

अॅमेझॉन मिनी टीव्हीवर लवकरच एक डान्स शो झळकणार असून, हिप हॉप इंडिया असं या शोचं नाव आहे. या शोच्या प्रीमियर पूर्वीच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट हिप हॉप डान्सर शोधून काढण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या शोबद्दल प्रचंड उत्सुकता असून, या शोमध्ये आपल्या नृत्य कौशल्याने घायाळ करणारी नोरा फतेही दिसणार असल्याचे अमेझॉन टीव्ही तर्फे जाहीर करण्यात आले आहे. नोरा ही या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसणार असून प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हा सहपरीक्षक असणार आहे. हे दोघे मिळून भारतातील सर्वोत्कृष्ट हिप हॉप डान्सर निवडणार आहेत. नोरा फतेही आणि रेमो डिसूजा या जोडीमुळे हा शो अधिक मजेदार होणार आहे.

या शोच्या निमित्ताने नोरा फतेहीचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोस्टरमधील नोरा फतेहीच्या अदांनी दर्शक घायाळ झाले आहेत. या पोस्टर्स सोबतच अॅमेझॉन मिनी टीव्हीने हा शो २१ जुलै रोजी प्रीमियर करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.  हिप हॉप या नृत्य प्रकारचे वर्णन गल्ली टू ग्लोरी असं केलं जातं. यामुळे हा शो सर्व स्तरातील प्रतिभावंत हिप हॉप डान्सर साठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

नोरा फतेही हिने म्हटले की, एखाद्याला थिरकताना किंवा नाचताना पाहिलं की माझ्या तोंडून हिप हॉप हे शब्द आपसूक निघतात. हिप हॉप हा खूप छान आणि मजेशीर नृत्य प्रकार आहे. अमेझॉन मिनी टीव्हीच्या या शोमध्ये परीक्षक बनणं, सहपरीक्षक आणि माझा मित्र रेमो डिसूजा सोबत प्रतिभावंत हिपहॉप डान्सरचे डान्स पाहणं आणि त्यातून सर्वोत्तम हिप हॉप डान्सरची निवड करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आम्ही या शो साठी सज्ज आहोत तुम्हीही तयार व्हा" अॅमेझॉन मिनी टीव्हीने आयोजित केलेल्या या डान्स शो मध्ये हिप हॉप डांसर्सना त्यांची प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी आहे. हा शो २१ जुलैपासून सुरू होत असून आपण हा शो, अमेझॉन शॉपिंग ॲप आणि फायर टीव्ही द्वारे अमेझॉन मिनी टीव्हीवर पाहू शकाल.

Web Title: Nora Fatehi will also be seen in the role of a judge in 'Hip Hop India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.