क्रिकेटरसोबत अफेयर होतं या अभिनेत्रीचं, नवऱ्यानं पकडलं होतं रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 06:00 AM2019-07-01T06:00:00+5:302019-07-01T06:00:00+5:30

चित्रपटसृष्टीत अशा कित्येक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी सिनेजगताला एक नवी ओळख दिली. जुन्या काळात अशा कित्येक अभिनेत्री होत्या ज्या काळानुसार गायब झाल्या.

noor jahan nazar mohammed affair controversy | क्रिकेटरसोबत अफेयर होतं या अभिनेत्रीचं, नवऱ्यानं पकडलं होतं रंगेहाथ

क्रिकेटरसोबत अफेयर होतं या अभिनेत्रीचं, नवऱ्यानं पकडलं होतं रंगेहाथ

googlenewsNext

चित्रपटसृष्टीत अशा कित्येक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी सिनेजगताला एक नवी ओळख दिली. जुन्या काळात अशा कित्येक अभिनेत्री होत्या ज्या काळानुसार गायब झाल्या. एक अशीच अभिनेत्री व गायिका आहे जी आपल्या अभिनय व गायन कौशल्यासोबतच लव्ह लाईफमुळे चर्चेत आली होती. या प्रसिद्ध गायिका व अभिनेत्रीचं नाव आहे नूरजहां.

 

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात अभिनय व गायन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नूरजहां १९४७ नंतर पाकिस्तानात गेली. तिथे त्यांनी गायन क्षेत्रातून पुन्हा आपल्या करियरची सुरूवात केली. 
गायन व अभिनयाव्यतिरिक्त नूरजहां त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होत्या. एका मुलाखतीत नूरजहां यांना त्यांचे किती बॉयफ्रेंड होते, असे विचारले असता त्यांनी मोजायला सुरूवात केली आणि पाहता पाहता हा आकडा १६ पर्यंत गेला.


इतकेच नाही तर नूरजहां यांचे नाव पाकिस्तानच्या टेस्ट क्रिकेटर नजर मोहम्मदसोबतही जोडले गेले आणि याच कारणामुळे नजर मोहम्मदचे करियरदेखील संपुष्ठात आले. 
खरं तर एक दिवस नूरजहां यांच्या नवऱ्याने तिला व नजर मोहम्मदला रंगेहाथ पकडले. नूरजहां यांच्या नवऱ्याला पाहून नजरने पहिल्या मजल्यावरून खिडकीतून खाली उडी मारली. त्यामुळे त्याचा हात तुटला. त्यामुळे त्याला टेस्ट क्रिकेटमधून रिटायर व्हावे लागले. २३ डिसेंबर, २०१८ साली नूरजहां यांचे निधन झाले. 

Web Title: noor jahan nazar mohammed affair controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.