​स्वरा भास्करजवळ ‘या’ गोष्टीसाठी नाही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 17:59 IST2017-01-05T17:59:49+5:302017-01-05T17:59:49+5:30

अभिनेत्री स्वरा भास्कर  आणि लेखक हिमांशू शर्मा यांच्या डेटींगच्या बातम्या तर तुम्ही ऐकल्या असतीलच. सध्या स्वरा हिमांशूसोबत लिव्ह-इनमध्ये राहते ...

No time for 'this' thing about Swara Bhaskar! | ​स्वरा भास्करजवळ ‘या’ गोष्टीसाठी नाही वेळ!

​स्वरा भास्करजवळ ‘या’ गोष्टीसाठी नाही वेळ!

िनेत्री स्वरा भास्कर  आणि लेखक हिमांशू शर्मा यांच्या डेटींगच्या बातम्या तर तुम्ही ऐकल्या असतीलच. सध्या स्वरा हिमांशूसोबत लिव्ह-इनमध्ये राहते आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण अलीकडे स्वरा जिथे जाते तिथे तिला लग्नाबद्दल विचारले जाते. तू कधी लग्न करणार? हा प्रश्न तिला विचारला जातोच जातो. अखेर स्वराने या प्रश्नाचे उत्तर दिलेयं. होय, या वर्षभरात स्वराचा लग्नाचा कुठलाही इरादा नाहीय. कारण स्वराकडे यासाठी अजिबात वेळ नाहीय. लग्नाचे प्लॅनिंग करायला आमच्याकडे अजिबात वेळ नाही. कारण आम्ही दोघेही संपूर्ण वर्ष प्रचंड बिझी आहोत. सध्या तरी लग्नाचा विचार करण्याची ही वेळ नाही, असे स्वराने स्पष्ट केले. आता स्वराला कधी वेळ मिळतो आणि ती कधी ‘सिंगल’ची ‘मिंगल’ होते, हे वेळ आल्यानंतरच कळेल. तोपर्यंत तरी स्वराच्या चाहत्यांना प्रतीक्षा करावीच लागणार.

अलीकडे स्वरा आपल्या टीममेंबर्ससोबत ख्रिसमस सेलिब्रेट करताना दिसली होती. सध्या स्वरा ‘ आपके कमरे में काई रखता है’ या वेबसीरिजमध्ये व्यस्त आहे. या वेबसीरिजमध्ये स्वरा एका कार्पोरेट महिलेची भूमिका करते आहे. या वेबसीरिजमध्ये स्वराच्या अपोझिट सुमित व्यास आहे. याआधीही स्वरा ‘इट्स नॉट दॅट’ या वेबसीरिजमध्ये ती दिसली होती. यात स्वराने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. ही वेबसीरिज विवाहबाह्य संबंधांवर आधारित असल्याने हे सीन्स कथेची गरज होती. पण स्वराने अगदी बिनधास्त हे सीन्स दिले.

यापूर्वी स्वरा ‘तनु वेड्स मनु’,‘रांझणा’,‘पे्रम रतन धन पायो’,‘निल बटे सन्नाटा’ यासारख्या सिनेमांत दिसली. लवकरच स्वरा ‘वीरा दी वेडींग’ या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: No time for 'this' thing about Swara Bhaskar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.