नो मेकअप, नो फिल्टर, करिना कपूरचा फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:14 PM2020-05-15T16:14:47+5:302020-05-15T16:21:31+5:30

बेबोचा हा सेल्फि सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

No makeup, no filter, kareena kapoor's photo viral on social media gda | नो मेकअप, नो फिल्टर, करिना कपूरचा फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

नो मेकअप, नो फिल्टर, करिना कपूरचा फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

googlenewsNext

लॉकडाऊनमुळे सध्या सर्व सेलिब्रेटी आपल्या घरीच आहे. कुटुंबीयांसोबत ते क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधतायेत. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावर ती तिचे आणि पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबतचे फोटो शेअर करत असते.

करिनाने स्वत:चा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. बेबोचा हा सेल्फि सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. करिनाच्या हा फोटो तिच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. या फोटोत करिना विना मेकअपमध्ये दिसतेय. विशेष म्हणजे ती फोटोत सनबाथ घेताना या फोटोत दिसतेय. विना मेकअप, नो फिल्टर असा फोटो बेबोने शेअर केला आहे. करिनाचे फॅन्स या फोटोला पाहून क्रेझी झाले आहेत. 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढामध्ये दिसणार आहे. सिनेमाची रिलीज डेट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग मध्येच थांबवण्यात आले त्यामुळे सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम होणार कसे ? त्यामुळे सिनेमा यावर्षी रिलीज होणे शक्य नाही आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे

Web Title: No makeup, no filter, kareena kapoor's photo viral on social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.