...या दिग्दर्शकामुळे लग्नाचा केला नाही विचार; आशा पारेख यांचा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 20:17 IST2017-04-18T14:47:05+5:302017-04-18T20:17:05+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख हिने नुकतेच तिचे एक पुस्तक दबंग स्टार सलमान खान याच्या उपस्थितीत प्रकाशित केले. त्यामुळे ...

... no idea of ​​marrying this director; Explanation of Asha Parekh !! | ...या दिग्दर्शकामुळे लग्नाचा केला नाही विचार; आशा पारेख यांचा खुलासा!!

...या दिग्दर्शकामुळे लग्नाचा केला नाही विचार; आशा पारेख यांचा खुलासा!!

लिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख हिने नुकतेच तिचे एक पुस्तक दबंग स्टार सलमान खान याच्या उपस्थितीत प्रकाशित केले. त्यामुळे पुन्हा एकदा आशाजींचे नाव चर्चेत आले आहे. कारण त्यांनी यावेळी चित्रपट निर्माता नासिर हुसेन यांच्याबाबत अतिशय खळबळजनक खुलासा केला आहे. होय, आशाजींनी सांगितले की, ‘चित्रपट निर्माता नासिर हुसेन एकमेव असे व्यक्ती आहेत, ज्यांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले होते’. आशा पारेख आणि नासिर हुसेन यांनी कित्येक सुपरहिट चित्रपट एकत्र केले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त या दोघांचे व्यक्तिगत संबंधही खूपच चांगले राहिले आहेत. ज्याचा उल्लेख आशाजींची बायोग्राफी ‘द हिट गर्ल’मध्ये करण्यात आला आहे. 



आपल्या लव्ह लाइफविषयी बोलताना आशा पारेख यांनी सांगितले की, ‘होय, नासिरजी एकमेव असे व्यक्ती होते ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केले. जर मी या पुस्तकात त्यांचा उल्लेख केला नसता तर, हे पुस्तक लिहिण्यास काहीही अर्थ उरला नसता’. यासाठी त्यांनी आपल्या सहकारी लेखकासदेखील क्रेडिट दिले. ‘माझा सहकारी लेखक खालिद मोहम्मद यांनी पुस्तकातील वाक्यांची खूपच चांगल्या पद्धतीने मांडणी केली. त्याचबरोबर आशाजींनी लग्न न करण्याचाही यावेळी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, मी लग्नाचा विचार केला नाही, कारण मी नासिरजी यांना माझ्या परिवारातून वेगळे करू इच्छित नव्हती. 



आशा पारेख यांच्यानुसार, मी कधीच घर तोडण्याचा विचार करीत नव्हती. माझ्या आणि नासिरजींच्या परिवारात कधीच दुरावा निर्माण झालेला नाही. आमच्यातील नाते खूपच चांगले राहिले आहे. आजही मी नुसरत (हुसेन यांची मुलगी) आणि इमरान यांना बघून खूश होते. इमरान तर माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी उपस्थित होता. आशा पारेख यांच्या पुस्तकाचे १० एप्रिल रोजी मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. 

Web Title: ... no idea of ​​marrying this director; Explanation of Asha Parekh !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.