निशिकांत कामत : इरफानसोबत काम करताना मज्जा आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 20:19 IST2016-05-30T14:45:53+5:302016-05-30T20:19:25+5:30

इरफान खान याचा ‘मदारी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निशिकांत कामत  दिग्दर्शित ‘मदारी’ हा एक सोशल-थ्रीलर ड्रामा ...

Nishikant Kamat: Working with Irfan came to rest | निशिकांत कामत : इरफानसोबत काम करताना मज्जा आली

निशिकांत कामत : इरफानसोबत काम करताना मज्जा आली

फान खान याचा ‘मदारी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निशिकांत कामत  दिग्दर्शित ‘मदारी’ हा एक सोशल-थ्रीलर ड्रामा आहे. एका सामान्य व्यक्तिची कथा म्हणजे  ‘मदारी’ . या व्यक्तिचे स्वत:चे एक प्रेमळ कुटुंब आहे. आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगत असताना ही व्यक्ती व्यवस्थेचा बळी ठरते. त्याचे सगळे काही हिरावून घेतले जाते. मात्र ही सामान्य व्यक्ती पराभव न पत्करता स्वबळावर सर्व काही परत मिळवते, अशी या चित्रपटाची कथा आहे. ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’ याप्रमाणे ‘मदारी’ हा सुद्धा वास्तवाची झालर असणारा चित्रपट आहे.‘मदारी’च्या निमित्ताने  दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी ‘सीएनएक्स डिजिटल  डॉट कॉम’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचाच हा सारांश...



इरफान आणि मी जुने मित्र..
इरफान खान आणि मी आम्ही दोघे जुने मित्र आहोत, असे सांगत निशिकांत यांनी अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘ इरफान व मी आम्ही दोघे जुने मित्र. टेलिव्हिजमधील संघर्षांच्या काळापासून आम्ही दोघे एकत्र आहोत. पण ‘मुंबई मेरी जान’मध्ये मी इरफानला कास्ट केले आणि आमची मैत्री चांगलीच घट्ट झाली.  इरफानने ‘मदारी’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याने मला विचारले. ‘मदारी’ची स्क्रिप्टआम्हा दोघांनाही आवडणारी अशीच स्क्रिप्ट होती. पण ती बरीच गुंतागुंतीची होती. आम्ही दोघांनीही त्यावर बरीच मेहनत घेतली. कथेचे अनेक पदर उलगडून दाखवतांनाच ही कथा सहज सोपी कशी होईल, याची आम्ही काळजी घेतली. मुलगा गमावलेल्या एका सामान्य बापाची ही कथा आहे. एका मोठ्या दुर्घटनेत  मुलगा गमावल्यानंतर या बापाच्या मनाची शांती हरवलेली असते. मात्र देशाच्या सरकारला त्याच्या या हानीची भरपाई करावी लागते. एक सामान्य नागरीक देशाच्या व्यवस्थेला आपल्या इशाºयावर कसे नाचवतो, ही या चित्रपटाची कथा आहे.

लोकशन महत्त्वाचेच..
निशिकांत कामत म्हणजे ‘पक्का मुंबई बॉय’. शहर, शहरातील जीवन आणि  काळानुरूप होणारे शहरी बदल हे सगळे निशिकांत यांनी जवळून अनुभवले आहे. हा अनुभव त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसतो.‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘मुंबई मेरी जान’प्रमाणे याही वेळी निशिकांत शहरी जीवनाला व्यापूर उरलेल्या नैराश्वावर भाष्य केले आहे.  या पार्श्वभूमीवर ते  भरभरून बोलतात.  काही चित्रपटांमध्ये स्थळ अर्थात लोकेशन केवळ प्रासंगिक असते. ‘फोर्स’ किं वा ‘दृश्यम’ हे चित्रपट असेच होते. म्हणजेच देशात कुठेही त्याचे शूटींग होऊ शकले असते. याठिकाणी लोकेशन फार महत्त्वाचे ठरत नाही. मात्र ‘डोंबिवली फास्ट’  सारख्या चित्रपटासाठी मात्र लोकेशन सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. याचप्रमाणे ‘मदारी’च्या कथेचीशहरी पार्श्वभूमी ही गरज आहे. ‘सैराट’सारख्या चित्रपटाने लोकेशन,भाषेचा बाज आदी किती महत्त्वपूर्ण ठरते, हे दाखवून दिले आहे, असे ते म्हणतात.



इरफानसोबत काम करताना मज्जा आली...
 ‘मदारी’चा प्रोड्यूसर कम फ्रेन्ड असलेल्या इरफानसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, यावर निशिकांत दिलखुलासपणे हसतात आणि हा अनुभव खरच आनंददायी होता, असे सांगतात. मज्जा आली. इरफानला सिनेमा मनापासून आवडतो आणि अभिनेता म्हणून तो एकदम फोकस्ड असतो. ‘मदारी’ करताना आमच्यात बºयाच चर्चा झाल्या, मतभेदही झालेत. पण चांगली गोष्ट म्हणजे,एकत्र येऊन काम केले. एकमेकांवर विश्वास ठेवून काम केले, असे ते म्हणतात.

 .

Web Title: Nishikant Kamat: Working with Irfan came to rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.